माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची फसवणूक

Vinod Kambli's cheating : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (cricketer Vinod Kambli) याची फसवणूक करण्यात आली आहे.  

Updated: Dec 10, 2021, 09:31 AM IST
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची फसवणूक title=
संग्रहित छाया

मुंबई : Vinod Kambli's cheating : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (cricketer Vinod Kambli) याची फसवणूक करण्यात आली आहे. केवायसी अपडेटच्या बहाण्याने 1 लाख रुपयांना लुबाडण्यात आले आहे. सायबर चोरांविरोधात वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर चोराशी फोन सुरु असतानाच खात्यातून पैसे गहाळ झाले आहेत.

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने विनोद कांबळी याच्या बँक खात्यातून 1लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे काढण्यात आले आहेत. वांद्रे पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बँकेतून बोलतो असं सांगत चोराने कांबळीला ऑनलाईन केवायसी अपडेटसाठी लिंक पाठवली. कांबळीने फोनवरच्या व्यक्तीला ओटीपी दिला. तात्काळ त्याच्या अकाऊंटमधून 1 लाख 14 हजार रुपये काढल्याचा त्याला मेसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळीने तक्रार दाखल केली आहे.  

विनोद कांबळी याच्या मोबाइलवर ३ डिंसेबर रोजी एका व्यक्तीने फोन केला. त्याने बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक खात्याचे केवायसी अपडेट नसल्याची माहिती त्याने दिली. केवायसी अपडेट न केल्यास खात्यामधील व्यवहार बंद होतील, असे त्याने सांगितले. त्यामुळे कांबळी याने ऑनलाइन केवायसी अपडेट करण्याची तयारी दर्शवली आणि यातून तो फसला गेला.

कांबळी याच्या बँक खात्यावरून 1 लाख 14 हजार रुपये परस्पर वळविले. याबाबत विचारणा करताच समोरील व्यक्तीने कांबळीसोबतचा संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळी याने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक पुरावे, बँक तपशील आणि मोबाइल क्रमांकावरून आरोपींचा शोध सुरु केला आहे.