मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व सेलिब्रिटी आपापल्या घरीच आहेत. क्रीडा विश्वातील दिग्गज खेळाडू देखील मैदान सोडून सोशल मीडियावर सक्रीय दिसत आहेत. टीम इंडीयाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण आणि सुरेश रैना यांनी इंस्टाग्राम लाईव्ह चॅट केले. यामध्ये त्यांनी हरभजन सिंहबद्दल एक मोठा खुलासा केला. ९० च्या दशकामध्ये जागतिक क्रिकेटवर राज्य करणारी ऑस्ट्रेलियन टीम 'भज्जी'ला घाबरायची असा किस्सा या चॅटमध्ये सांगण्यात आला.
कोरोना दरम्यान लाईव्ह चॅटसाठी आलेल्या रैना आणि पठाणने भज्जीचे किस्से सांगितले. भज्जीसारखा कोणीच नाही. तो एक लेजंड आहे. त्याच्याशिवाय कोणताही स्पीनर शंभर टेस्ट खेळला नाही असे इरफान पठाणने यावेळी सांगितले. यावर ऑस्ट्रेलियन टीम भज्जी ला घाबरायची असा किस्सा रैनाने सांगितला. भज्जीचे नाव ऐकताच ऑस्ट्रेलियन खेळाडू स्तब्द राहायचे असे पठाणने सांगितले.
हरभजनने रोहीत शर्मासोबत देखील लाईव्ह चॅट केले होते. ऑस्ट्रेलियन खेळाडू मला पाहूनच ऑऊट व्हायचे असे भज्जीने लाईव्ह चॅटदरम्यान रोहित शर्माला सांगितले.
रिकी पॉटींग माझा चेहरा बघून आऊट व्हायचा. मला बॉलिंग करायची गरज देखील लागायची नाही. रिकी पॉंटीग मुंबई इंडीयन्ससाठी खेळ्यासाठी आला होता. नेट्समध्ये खेळून त्याचा खेळ बदलला असेल असे मला वाटले होते. पण मी त्याला तिथे देखील अनेकवेळा आऊट केले अशी आठवण भज्जीने सांगितली.