सचिनकडून एका संस्थेला मदत, ४ हजार कुटूंबांना फायदा होणार

मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरने कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या जवळजवळ 

Updated: May 9, 2020, 07:10 PM IST
सचिनकडून एका संस्थेला मदत, ४ हजार कुटूंबांना फायदा होणार title=

मुंबई  :  मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरने कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या जवळजवळ ४ हजार गरीब लोकांना आर्थिक मदत केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने किती रूपयांची मदत केली आहे. याविषयी माहिती मिळू शकलेली नाही. 

सचिन तेंडुलकरने ही मदत सामाजिक संस्था (एनजीओ) 'हाय 5'ला दिली आहे. सचिन तेंडुलकरने ट्वीट केलं आहे.'दैनिक पगार ज्यांना दिला जातो त्यांच्या परिवाराला आधार म्हणून 'हाय5'च्या प्रयत्नांना शुभेच्छा!'

या संस्थेने देखील ट्ववीट करून गरजू लोकांच्या मदतीविषयी सचिन तेंडुलकरचे आभार मानले आहेत. या संस्थेने सचिन तेंडुलकरला टॅग करत लिहिलं आहे, धन्यवाद सचिन तेंडुलकर, आपण दिलेले दान, आम्ही कोव्हिड-१९ मुळे चिंतेत असलेल्या ४ हजार कुटूंबांना मदत करू शकतोय.

यात मुंबई महापालिकेचे विद्यार्थी देखील सामिल आहेत, सचिन तेंडुलकर यांनी याआधी पंतप्रधान मदत निधीत आणि मुख्यमंत्री मदत निधीत २५ - २५ लाखांचं दान दिलं आहे. सचिन यांनी मुंबईतील ५ हजार कुटूंबियांना १ महिन्याचं जेवण देण्याविषयी म्हटलं होतं.