'या' क्रिकेटरच्या घरी आली 'नन्ही परी'

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूला 'कन्यारत्न' 

Updated: Oct 5, 2019, 03:10 PM IST
'या' क्रिकेटरच्या घरी आली 'नन्ही परी' title=
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे बाबा झाला आहे. सोशल मीडियावरुन ही गोड बातमी समोर आली आहे. अजिंक्यची पत्नी राधिका रहाणेने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. 

यावर्षी जुलै महिन्यात अजिंक्य रहाणेने तो बाबा होणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं होतं. 

 
 
 
 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

हरभजन सिंगने ट्विटरवर ही गोड बातमी शेअर करत अजिंक्यला शुभेच्छा दिल्या आहेत. 

अंजिक्य रहाणेने 2014 मध्ये लहाणपणाची मैत्रीण आणि शेजारी राहणारी राधिका धोपावकरसोबत विवाह केला होता.