दयाशंकर मिश्र : फेसबुकवर मागील काही दिवसात १० पोस्ट पाहायला मिळाल्या. यात या गोष्टींवर दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे की, आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी वेळ नाही मिळाला. पण जेव्हा आईवडिलांसारखी प्रिय व्यक्ती या जगात राहिली नाही, तेव्हा शेवटचा निरोप देण्यासाठी मोठी सुटी घेतली, किंवा वेळ काढला.
यात एका पोस्टमध्ये लिहिलं होतं की ते आपल्या आईला पाहण्यासाठी जाऊ शकले नाहीत. आई अनेक दिवसांपासून आजारी होती तरी देखील. यात एक खंत व्यक्त करण्यात आली आहे की, आई हयात असताना तिच्यापर्यंत पोहोचलो असतो, तर काही दिवस तिच्यासोबत काढू शकलो असतो.
एका दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, अनेक दिवसांपासून त्यांच्या मित्राशी बोलणं नाही झालं. हे काम संपलं की बोलू या असं मनात होतं, पण असं करता करता एक वर्ष झालं. पण यानंतर ऐकण्यात आलं की, त्या मित्रासोबत काहीतरी वाईट घडलं.
जीवन खूपच लहान, आणि आपल्या हातात नाहीय. आपल्याला नेहमी भ्रम असतो की, हे आपल्या हातात आहे. पण प्रत्यक्षात हे एकदम उलट आहे. आपण निसर्गाच्या नियमात बांधलेलो आहोत, हे अटळ आहे.
जीवनाला जरी आपण 'पोस्ट पेड' समजत असलो, तरी जीवन हे 'प्री-पेड' आहे. 'प्री-पेड'मध्ये बॅलन्स संपला की, सर्व विनवण्या संपलेल्या असतात. जीवनातला श्वासच 'प्री-पेड' कनेक्शन आहे.
शहर, नोकरी आणि सोशल मीडिया जीवनाच्या महत्वाच्या बाजू झालेल्या आहेत. आता तर प्रत्येक लहान-मोठ्या शहरात गोष्टी लागू झाल्या आहेत. याआधी फक्त मोठ्या शहरांमध्येच या गोष्टींची चिंता होती. याच्या राहटगाडग्यात जीवनाचा बेसूर वाटू लागतं. अगदी तसंच जेव्हा थंडीच्या दिवसात दिल्लीतून जाताना तोंडात कडवटपणा जाणवतो.
जीवनाची एकरसतेच्या दरम्यान जीवन अशा गोष्टींचा सामना करतं. जेव्हा आपण आजूबाजूच्या सर्व खिडक्या बंद करतो, तेव्हा स्वाभाविकपणे ही खालमेल होते.
तर या जीवनात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी खिडक्या उघडू या.
१) प्रत्येक दिवशी १० मिनिटं, जरूर काढा. या १० मिनिटात तुमची नोकरी, दररोजचं काम या गोष्टींचा काहीही संबंध नसेल.
२) ऑफिसला येताना अशा लोकांच्या संपर्कात राहा, ज्यांच्याशी ऑफिसच्या कामाचा काहीही संबंध नसेल. यामुळे तुम्हाला ‘स्विच ऑन आणि ऑफ’ करण्यात मदत मिळेल.
३) काहीही करा पण न टाळता, झाडांसोबत, निसर्गात काही वेळ घालवा. कारण या निसर्गात आपल्यातील निगेटीव्ह एनर्जी दूर करण्याची मोठी क्षमता आहे.
४) आराम करण्याचा अर्थ मोबाईल, यूट्यूब, टीव्ही पाहणे नाही, यापासून वेगळं आणि जेवढं लांब राहू शकतात, राहा. कारण आपण घरी जेवढं ऑफलाईन राहू शकतो, तेवढंच तुम्हाला पॉझिटीव्ह वाटेल.
५) मोबाईलला प्रत्येक गोष्टीसाठी गरज बनवू नका, एक अलार्म घड्याळ आणा, मुलांना सकाळी उठण्यास मदत होईल. सकाळी सकाळीच मोबाईल दर्शन घेण्याची गरज नाही.
या खिडक्या उघडल्यानंतर तुमच्या जीवनात निश्चित स्वरूपात वेळ वाचेल. जो वेळ आपल्या कुटूंबासाठी असेल, ज्या वेळेमुळे जगाशी आपला संपर्क तुटलाय.
ज्याच्याशी बोलण्यात आनंद येतो, त्यांच्यासाठी वेळ काढणं डोक्यात राहत नाही, असे मित्र, नातेवाईक यांच्या नियमित संपर्कात राहा. ज्यांच्याशी बोलल्यानंतर सुख मिळतं. ज्यामुळे शहरी जीवनात वाढणारा तणाव, रूक्षपणा दूर होण्यास मदत होईल.