डिअर जिंदगी : किती 'नवीन' आहोत आपण!

आपण प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी जुने होत आहोत, त्यात नवीनपणा कसा येणार, कसा येणार याचा उपाय कुठे आहे. यासाठी वय तर वाढून जातं. पण विचार तेच असतात. विचार, समजुतदारपणात वाढ, नवीन गोष्टी स्वीकारणे हे फार कमी लोकांना जमतं.

Updated: Oct 26, 2018, 10:33 PM IST
डिअर जिंदगी : किती 'नवीन' आहोत आपण! title=

दयाशंकर मिश्र : आठवण या शब्दाला किती समान शब्द आहेत, जरा विचार करा. यानंतर थोडंस थांबा. आता या शब्दात भूतकाळ आला का? जरा आला असेल तर खूप छान, पण नसेल आला तर, आला असता तर, बरं झालं असतं!

हे याच्यासाठी की नव्याविषयी बोलताना आपण नेहमी, भूतकाळाला चिपकून असतो. भूतकाळाला आपण लागून असतो, कारण आपण स्वत:ला आठवणींच्या शहरातून बाहेर नाही काढू शकत. आपण नव्याची योजना बनवताना, नेहमी जुन्याच्या आसपास असतो. जर आपण नव्याची रचना, जुन्याचा विचार करून करत असू, तर नवीन येणार कुठून?

आपण प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी जुने होत आहोत, त्यात नवीनपणा कसा येणार, कसा येणार याचा उपाय कुठे आहे. यासाठी वय तर वाढून जातं. पण विचार तेच असतात. विचार, समजुतदारपणात वाढ, नवीन गोष्टी स्वीकारणे हे फार कमी लोकांना जमतं.

एक सरळ उद्देश आहे तो समजतो...

एका मित्राच्या बहिणीने २० वर्षाआधी प्रेमविवाह केला. पण जो मित्र स्वत:ला आधुनिक समजण्याची एक संधीही सोडत नाही. त्याचा आपल्या बहिणीने नोकरीला असलेल्या सुशिक्षित मुलाशी विवाह केला, यावर आक्षेप होता, कारण त्यांची जात वेगवेगळी होती.

हा वाद खूप विकोपाला गेला होता. काही वर्षांनी या परिवाराने अतिशय विचित्र वळण पाहिलं. कारण त्यांच्या दुसऱ्या मुलीने जातीतच लग्न केलं, आणि पाच वर्षात तिची फारकत झाली. कारण त्या मुलाने आपल्या जीवनातील अनेक वर्ष मुंबईत घालवली होती. त्यामुळे एका छोट्या शहरात एका मुलीसोबत ताळमेळ बसवण्यात त्याला अडचणी येत होत्या. शेवटी सोडचिठ्ठी झालीच.

आता २० वर्षांनंतर..

आता त्यांच्या मुलीने त्यांनी सुचवलेल्या मुलाशी विवाह करण्यास नकार दिला. यासाठी नाही की, तिची पसंत काही वेगळी आहे. पण यासाठी की, तिला अधिक शिक्षण घेतलेला आणि तिच्या क्षेत्रातला जीवनसाथी पाहिजे म्हणून.

मित्र खूप फॅशनेबल आहे, सोशल मीडियावर वॉल आधुनिक विचारांनी भरून पडली आहे. स्वत:ला आधुनिक म्हणण्याची कोणतीही संधी सोडत नाही, आता मुलीच्या विरूद्ध उभे ठाकले आहेत.

त्याने मला विचारलं, मी सांगितलं, 'भावा काही तरी नवीन सांग, तू नेहमीच विरूद्ध का उभा ठाकतो, काळ बदलतोय, पण तुझ्या विचारात, दृष्टीकोनात, समजदारीत कोणताच बदल झाला नाही'.

मी हे सांगून विषय गुंडाळला, 'तूम्ही शिकवलं, यात काही वेगळं केलं नाही, आजकाल तो वेगळा आहे, जो मुलांना शिकवत नाही, तुम्ही त्यांना स्वातंत्र्य, सुविधा दिली, जे सहज मानवतेचं आणि प्रत्येक पित्याचं कर्तव्य आहे. यात अद्भूत काहीच नाही. हां, तुमच्याजवळ स्वत:ला सिद्ध करण्याची एक संधी होती, पण तुम्ही मुलीच्या पसंतीला असहमती दाखवली, आणि तिच्यावर रागावून बसले.'

'तुम्ही कसे नवीन आहात ! नवीन म्हणून चालणार नाही, नवं दिसावं लागेल. नवं सिद्ध करावं लागेल. नवं नेसण्याची वस्तू नाहीय. तो सतत आतला विचार आहे. मनातल्या आतचे कंगोरे नाही बदलले, तर बाहेरून त्याला काहीच अर्थ नाही.' 

ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com

पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)