Suryakumar Yadav : सूर्याच्या 'नो लुक शॉट' चा swag आणि पंड्याचा गॉल्फ चिप

सध्या एक 'नो लुक शॉटची' (No Look Shot)  भर पडली आहे. म्हणजे  बॉल बॅटला कनेक्ट झाला की बॅट्समनला कळतं हा स्टँड मध्ये चालला आहे आणि बॅट्समन त्या चेंडुकडे न बघता त्याच्या पार्टनरशी बोलायला पिचवर चालू लागतो. 

Updated: Sep 26, 2022, 08:58 PM IST
Suryakumar Yadav : सूर्याच्या 'नो लुक शॉट' चा swag आणि पंड्याचा गॉल्फ चिप title=
प्रातिनिधिक छायाचित्र

रवि पत्की :  आपला बेदरकारपणा बॉलरला दाखवून त्याचे खच्चीकरण करण्याच्या अनेक क्रिया बॅट्समननी (Batsman) वापरल्या आहेत. त्यात विव्हसारखे बेफिकरीने चिविंग गम तोंडात रगडत बॅटिंगला येणं, स्ट्रेट ड्राइव्ह किंवा कव्हर ड्राइव्ह मारल्यावर फॉलोथ्रूच्या स्थितीत शॉट admire करत बराचवेळ राहणे, स्टेडियममध्ये सिक्स मारल्यावर शांतपणे  बॅटने पिच टॅप करणेवगैरे swag चे प्रकार बॅट्समनला वेगळीच किक देत असतात. त्यात सध्या एक 'नो लुक शॉटची' (No Look Shot)  भर पडली आहे. म्हणजे  बॉल बॅटला कनेक्ट झाला की बॅट्समनला कळतं हा स्टँड मध्ये चालला आहे आणि बॅट्समन त्या चेंडुकडे न बघता त्याच्या पार्टनरशी बोलायला पिचवर चालू लागतो. हा Ultimate Swag आहे. ह्यात प्रेक्षकांच्या कल्ल्याला सुदधा ignore करायचा उद्दामपणा आहे. "हा कसला गोंधळ आहे.मी माझ्या मस्तीत आहे' हा तो लोभस बेदरकरपणा आहे.जसे शायर जोन एलीया म्हणतो (ind vs aus t 20 series 2022 team india suryakumar yadav no look shot against australia ravi patki blog)

ये दादो तेहसीन का शोर है क्यूँ
हम तो खुद से कलाम कर रहे हैं |

सध्या सूर्यकुमार यादव ह्या नो लुक शॉट च्या swag ने घायाळ करत आहे. Bowler धावत आला की या चेंडूवर आपण अमुक एक शॉट मारायचा असे खूप बॅट्समन ठरवतात पण ठरवलेलं execute करणं भयंकर अवघड असतं. त्यात तो शॉट कुठे मारायचा, गॅप कुठे आहे,त्याकरता काय adjustment करायची हे शेवटच्या क्षणी सगळं जुळून येणं म्हणजे genius at work. 

सूर्यकुमारचे उत्स्फूर्त, नाविन्यपूर्ण, यशस्वी, 360 अंशातले शॉट मेकिंग बघून तो आत्तापर्यंतचा भारताचा white ball क्रिकेट मधला सगळ्यात गिफ्टेड बॅट्समन आहे, असं मी निःसंशयपणे म्हणू शकतो. विशेष म्हणजे हे सगळं करताना त्याचे सातत्य कमालीचे आहे,जी दुर्मिळ गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियातल्या फास्ट पीचेसवर त्याची टप्प्यावरची (on the rise)बॅटिंग बघायला मी उतावीळ आहे.

हार्दिक पंड्याने शॉर्ट आर्म पंचेसचे नवे दालन उघडलंच होतं. त्यात त्यानी तिसऱ्या टी 20 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध लो फुलटॉसवर मिडऑफ वरून एक गोल्फ चिप style 'व्हेरी शॉर्ट आर्म' पंच मारला. मला वाटलं हा मिडॉनपर्यंत जाईल. तो गेला लॉगऑनच्या डोक्यावरून सीमारेषेबाहेर. अशक्य टायमिंग आणि खांद्यातली ताकद.

अक्षर पटेल चेंडू न वळवता अचूकतेवर पोत्याने विकेट काढतोय. त्याच्या फ्लाईटचा आणि आर्म बॉलचा अंदाज बॅट्समनला येत नाही.तो जडेजापेक्षा जास्त परिणामकारक बॉलर सिद्ध होतोय. 4 कंजूष ओव्हर्स टाकल्या आणि थोडया धावा केल्या, तर तो दुसऱ्या अष्टपैलूची जागा चांगली घेतोय, असं म्हणलं पाहिजे. तसेच ऑस्ट्रेलियातील भव्य मैदानात स्पीनर्स उपयोगी ठरणार आहेत. टीम इंडियाचा हैदराबादचा विजय संघासाठी आश्वासक आहे. फक्त भुवनेश्वरच्या शेवटच्या ओव्हर्सची राष्ट्रीय समस्या लवकर सुटायला हवी.