पोपट पिटेक, मुंबई : तिळाचा वापर अनेक देशात मोठ्या प्रमाणात होतो. ग्रामीण तसेच शहरी भागात तिळापासून वेगळेगळ्या प्रकारच्या चटण्या तसेच बेकरीच्या पदार्थातही याचा भरपूर वापर केला जातो. तिळाचा वापर हा आसाम, मणीपूर, नागालॅडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.
भारतात तिळाचं सर्वात जास्त उत्पादन होते. तेलबियांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात भारतातचं घेतले जाते. त्यामुळेच तिळांच्या उत्पादनात काही दिवसातच शेतकरी चांगले पैसे कमवू शकतो.
तिळाचा वापर मुख्यत: तेल बनवण्यासाठी केला जातो. भारतातील राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आणि तेलंगणामध्ये तिळाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
भारतासह म्यानमार, सुदान, चिन, युगांडा आणि नायजेरिया या ठिकाणीही तिळांची लागवड केली जाते. तिळाचं उत्पादन मिळवण्याच्या बाबतीत आशिया खंडात सुमारे 68 टक्के आणि आफ्रिकेत हेच प्रमाण 25 टक्के आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की तीळाला किती मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
तिळाची लागवड कशा प्रकारे केली जाते, पेरणी कधी करावी ?
तिळाची पेरणी करण्यासाठी पावसाळ्यात म्हणजे जुलैचा शेवटचा आठवडा चांगला समजला जातो. तिळ पेरण्यासाठी एका हेक्टरमध्ये 6 ते 7 किलो बियाणं आवश्यक आहे. पेरणीपूर्वी शेतात ओलावा असणं गरजेच आहे. परंतू शेतात ओलावा नसेल तर पिकांची वाढ योग्य प्रकार होणार नाही. मातीची पिएच श्रेणी 5 ते 8 आसपास असणं गरजेचं आहे. पेरणीपूर्वी दोन ते तीन वेळा खुरपणी करुनच शेती चांगली तयार करणं गरजेचं आहे. तसेच तणांचे नियंत्रण करणं देखील सुनिश्चित करुन ठेवणं आवश्यक आहे.
लागवडीसाठी तापमान किती गरजेचं ?
तिळ पिकांच्या लागवडीसाठी जास्त तापमानाची गरज असते. तिळाच्या पिकांसाठी 25 ते 35 अंश तापमानात तिळ हे चांगल्या प्रकारे कसित होतो. तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेल्यास गरम वा-यांमुळे तिळातील तेलाचे प्रमाण कमी करु शकतो. दुसरीकडे हेच तापमान 15 अंशांच्या खाली गेलं तरी पिकाचं नुकसान होतं.
किती कमवू शकता ?
तिळांची लागवड केल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न कमवू शकता. शेतकरी स्वत: तिळापासून तेल काढून बाजारात विकून लाखोंचा नफा मिळवू शकतो. तसेच बाजारात थेट तिळांची विक्री करुन देखील चांगल्या प्रकारे पैसे कमवता येतो. तिळापासून अनेक प्रकारचे तेल उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे मार्कटमध्ये तिळाची किंमत जास्त असते. अनेक कंपन्याकडून थेट शेतक-यांकडूनच चांगल्या किंमतीत तिळ विकत घेत असल्यानं शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात तिळ लागवडीकडे वळू लागले आहेत.