डिअर जिंदगी : आत्‍महत्येने काहीच बदलत नाही!

डिअर जिंदगीचं हे सदर ज्या ठिकाणाहून लिहिलं जात आहे, तेथून समुद्र अतिशय सुंदर, 'गोड' आणि आपलासा वाटतोय. एवढा जवळचा की तो जवळ जाऊनही कधी एवढा आपलासा वाटला नव्हता.

Updated: Nov 29, 2018, 12:51 PM IST
डिअर जिंदगी : आत्‍महत्येने काहीच बदलत नाही! title=

दयाशंकर मिश्र : डिअर जिंदगीचं हे सदर ज्या ठिकाणाहून लिहिलं जात आहे, तेथून समुद्र अतिशय सुंदर, 'गोड' आणि आपलासा वाटतोय. एवढा जवळचा की, तो जवळ जाऊनही कधी एवढा आपलासा वाटला नव्हता. सुंदर दृश्याचं सौंदर्य कधीही जवळ गेल्यानंतरच मनात भरतं. लांबून समुद्राचा 'खारटपणा' दिसत नाही, जीवनाचा स्वादही असाच काहीसा आहे.

एक दुसऱ्याच्या पाठिंब्यासाठी आपण किती तरी गोष्टी करतो. कुणाची तरी वाट पाहताना, वाटेकडे डोळे आणि नजर लावून बसलेलं मन. स्वप्न पाहणारं मन, काय काय विचार करत असतं. जेव्हा साथ मिळत नाही, तर दुसऱ्या क्षणाला मन उलट विचार करू लागतं. एक दुसऱ्यासाठी वाट पाहणारे डोळ्यांमध्ये, एकमेकांसाठी आग दिसायला लागते. अपेक्षांनी बहरलेल्या मन फुलासारखं फुललेलं असताना, अचानक एकमेकांसाठी काट्यांनी भरून जातं. 

जीवनाला डिप्रेशनकडे घेऊन जाणाऱ्या रस्त्यावरच चेकपोस्ट बनवणे गरजेचे आहे. तणाव, प्रचंड नैराश्य, एका दिवसात आपल्या मनावर राज्य करू शकत नाही. ते हळूहळू आपल्यावर राज्य करतं. आपण आपलंच दु:ख, चिंता वाचण्यात एवढे अपयशी होत चाललो आहोत, की आपल्याला पुराचं पाणी घरात घुसून आल्यावरच कळतं, की आपल्या घरात पुराचं पाणी शिरलंय.

आपल्याला हे तेव्हा कळतं, आणि त्यावेळी एकच शब्द उरलेला उसतो 'जर'. या 'जर' आपल्या संकटांना लागू होण्याचं आपण टाळलं तर, मानव आणि मानवतेला आपण वाचवू शकतो.

मुंबईत प्रकाशित झालेल्या प्रमुख न्यूज पेपर्समध्ये एका बातमीला कुठे ना कुठे जागा मिळतेच. कल्याणच्या प्रसिद्ध महावीर हाईट्समध्ये पती आणि २ मुलांसह राहणाऱ्या डॉ. प्राजक्‍ता कुलकर्णी यांनी सकाळी उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे.

अशा घटना मोठ्या प्रमाणात चर्चेत येण्याची २ कारणं आहेत. पहिला मुद्दा म्हणजे, मुंबईजवळ असलेली घनदाट वस्ती. तर दुसरीकडे मीडियाला पॉश भागातली आत्महत्येची बातमी जास्त आकर्षित करते. दुसरी गोष्ट प्राजक्ता डॉक्टर होती. एकूणच घरात आर्थिक आणि दुसरीकडे सामाजिक परिस्थितीत कोणताच तणाव नसेल. शेजाऱ्यांच्या मते, कुलकर्णी दाम्पत्य शांततेत आणि प्रेमात वावरणारं होतं.

आत्महत्येच्या बाबतीत एक 'मिथ' असं आहे की, गरीबी आणि साधनांची कमतरता. आत्महत्येच्या धोक्यापासून पैसा, प्रतिष्ठा आपल्याला वाचवू शकतात. पण हे आता पूर्णपणे खोटं आणि असत्य वाटतंय.

आत्महत्येपासून आपल्याला केवळ एकच गोष्ट वाचवू शकते, आणि ती आहे आपली आत्मशक्ति!, अत्यंत दयनीय परिस्थितीतही आपल्यावरचा प्रचंड आत्मविश्वास. कारण आत्महत्या माणूस करतो कशासाठी तर, त्याचा कुणावरचा तरी विश्वास उठतो. दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे तर ठिक आहे, पण एवढा विश्वास ठेवला जातो, की तो तुटला तर जीवनावर ते भारी पडतं, तेथे आत्मशक्ती ढासळते.

एक महत्वाची गोष्ट, डिप्रेशन आणि आत्महत्या या प्रकरणांचा जवळून अभ्यास केल्यानंतर, असं लक्षात येतं की, यामागे आपण एक 'धडा' घेतो. माझ्याशिवाय जगून दाखव, तेव्हा लक्षात येईल, जीवन किती कठीण आहे. मी असेल किंवा नसेन, तेव्हा कळेल तुला जीवन कसं असतं.

अरे! हा वेडेपणा आहे, जे सांगूनही पटणार नाही. तुम्ही सांगूनही कळतंय, पण वळत नाही, तर तुम्ही जीव दिल्यानंतर, काय बदलणार आहे का? हिंदी सिनेमातील आत्महत्येसारख्या अविचारी गोष्टींपासून बाहेर या.

पाहा, जीवनात अनेक रस्ते आहेत, पाहाल तिकडे रस्ता आहे. ती सहकाऱ्याच्या शोधात आहे, आणि तुम्ही तिच्यापासून दूर पळतायत. तुम्ही जीव दिल्याने काहीच बदलणार नाही. जर जिवंतपणी तुम्ही बदलवू शकले नाही, तर आत्महत्येनंतर तरी हे जग कसं बदलेल. यासाठी जीवन जगण्याची पद्धत शोधा. जगण्याचे शंभर मार्ग आहेत. पण मरण्यासाठी फक्त एकच. जीवन जगणं अजिबात कठीण नाही.

ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com

पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)