दयाशंकर मिश्र : जेव्हा कधी आपण कुणाच्या मदतीच्या बाबतीत विचार करतो, तेव्हा सर्वात आधी येतो तो विश्वास. सर्वात आधी अडचण मन या ठिकाणाहून येते. असं मन जे आपल्या बाबतीत शक्तीचं सूत्रधार आहे. मनंच आपल्याला जिंकण्याची शक्ती देत, हरलो तर मनाची शक्ती कमी पडते. मनाची दूर्दम्य इच्छाशक्ती सर्वकाही करू शकते. मनातूनच सर्व गोष्टी होतात.
जे काही सांगितलंय, त्यात नवीन काहीच नाही, आपण सर्व याबाबतीत जाणतो. पण नेहमीच जाणून घेणं पुरेसं असतं का?. नेहमी असंच होतं, आपण जाणूनही चूक करतो. चक्रव्यूव्हमध्ये अडकल्यावर आपण विचार करतो. तरी देखील आपण त्यात दाखल होतो. कारण ती मनाची इच्छा असते.
आपल्या शक्तीचं पॉवर हाऊस आपलं मनचं अशतं. भूतकाळातल्या फाईलची पानं उलटून पाहा, आपली संघर्षाची तयारी सुरूवातीला अधिक होती. आपण जीवनात येणाऱ्या आव्हानांबद्दल उदार होतो. आपल्याला त्या उन्हातल्या दिवसात, संघर्ष करण्याची सवय होती. आपण एकमेकांबद्दल अधिक संवेदनशील होतो.
आपण सोबत चालल्याने कमजोर नाही, पण अघोषित नियमांना स्वीकारणाऱ्या समाजासोबत होतो. आपण आदरतिथ्य ते अडचणीच्या वेळेत साथ देणाऱ्यांमध्ये ओळखले जात होतो. ही ओळख बदलायला लागली आपला स्वभाव देखील बदलू लागला.
एक सरळ सरळ उदाहरण आहे, या आधी कुणाच्याही मित्रावर संकट कोसळलं तरी आपण कोणताही विचार न करता तेथे पोहोचत होतो. ज्याच्यात हा गुण नव्हता, त्याला योग्य समजलं जात नव्हतं. तो जरा वेगळा आणि सर्वांपासून वेगळा असणारा आहे, असा समज असे.
आता जरा तुमच्यावर या. परिवारात एखाद्या व्यक्तीला रात्रंदिवस समजवण्यात गुंतलेले असतात, की कशाला सर्वांच्या मदतीला धावत सुटतो, त्याला तसं 'बरोबर' करण्याचा प्रयत्न केला जाता, त्याला सांगितलं जातं, कशाला दुसऱ्यांच्या भानगडीत पडतो.
नीट पाहा, आपण मनुष्य असण्याची परिभाषेच्या विरूद्ध जात आहोत. आपली सामाजिक उदारता, मिसळण्याची आवड सोडून आपण संकुचित होत चाललो आहोत. आपलं मन उदार, स्नेहील, आत्मीय आणि सर्वसमावेशक होण्याऐवजी संकुचित होत आहोत. दुसऱ्यांविषयी वाढलेली कठोरता, आपल्या आतील जागेची कमतरतेचा मोठा अभाव आहे. पण हेच आपल्याकडे बुमरँग होऊन परतलं तर नुकसानच होणार आहे.
आपण एक दुसऱ्यासाठी वेळ जेवढा कमी करत आहोत, तेवढंच एकमेकांविषयीचं प्रेम कमी होत चाललं आहे. मी माझ्या आजूबाजूला अशा मोठ्या संख्येने लोक पाहत आहे, ज्यांचा कुटूंबाकडे पाहण्याचा दृष्टीकोनंच बदलून गेला आहे.
आता कुटूंबाचा अर्थ झाला आहे, पती-पत्नी आणि मुलं. अरे आईबाबा गेले कुठे?. आईवडिलांविषयी धारणा ही होत चालली आहे की, ते ज्या भावासोबत राहतात ते त्या परिवाराचा भाग आहेत. जर त्यांच्याकडे बचत असेल, तर ते स्वतंत्र आहेत. जर नाही तर वेळोवेळी त्यांची मदत करणे महत्वाचे आहे. पण मुलांना वाटतं की ते आपल्या परिवाराचा भाग नाहीत.
न्यूज पेपर्समध्ये रोज एकतरी आत्महत्येची बातमी असते. अशा शहरांमधून आत्महत्येच्या बातम्या येतात, जी शहरं स्नेहिल, मजेत जीवन, आणि मिळून मिसळून वागणाऱ्यांची शहरं मानली जातात. नेहमी आनंदी राहणारी शहरं देखील तणाव आणि डिप्रेशनच्या रेंजमध्ये आली आहेत. लखनौ, भोपाळ, इंदूर, जयपूर, रायपूर, रांची, पाटणा, भुवनेश्वर सारख्या शहरांमध्ये आत्महत्या सतत चिंतेचा विषय आहेत.
आपण उपदेश, व्हॉटसअॅप फॉवर्ड सारखं जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत नाहीत. आतल्या आत आपल्या मनाला थोडं उदार बनवण्याची गरज आहे. बस थोडंस, जितकं आहे, त्यापेक्षा आणखी थोडंस.
जगाला अधिक सुंदर बनवण्यासाठी थोड्या थोड्याची गरज आहे, खूप अधिक नाही. यासाठी परिवार, मित्रांना मदतीची गरज असेल, जेवढं करू शकतात, त्यापेक्षा आणखी थोडंस जास्त करा.
या थोड्यातच एवढी शक्ती आहे, यातून फार मोठा तणाव, नैराश्यचा परिणाम कमी होवू शकतो. यामुळे अशा बातमीपासून तुम्ही वाचू शकता, जी बातमी तुम्हाला जीवनभर एक 'कैदी' होण्याचं दु:ख देईल.
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)