दयाशंकर मिश्र : डिअर जिंदगी सुरू केल्यानंतर काही महिने झाले होते, तेव्हा फेसबूक मॅसेंजरवर त्याचा मेसेज आला, 'मी या जीवनाला कंटाळली आहे. नवीन सुरूवात करू इच्छीते, पण हिंमत होत नाहीय, सासरी मी आजीवन तुरूंगवास भोगतेय, मी काय केलं पाहिजे.'
खरंतर अशा प्रश्नांचं उत्तर मेसेंजरवर देणं कठीण असतं. कारण यात आपली त्या व्यक्तीशी कुठलीही ओळख नाही, आणि त्याबद्दलची काही माहिती देखील नाही. थोडीशी बातचीत झाल्यानंतर मी सांगितलं.
लग्नाच्या दहा वर्षानंतरही जर सासर तुम्हाला आजीवन तुरूंगवास वाटत असेल, तर नवऱ्याशी महिन्यात एकदाच बोलणं होत असेल. 'तुमची तेथे एवढी गळचेपी आहे की, तुम्ही आत्महत्येबद्दल विचार करीत आहात. तुम्ही एमए, एमएड केलं आहे. तर तुम्ही याबाबतीत लवकर निर्णय घेतला पाहिजे'. नाती महत्वाची आहेत. पण ते जीवनाच्या किंमतीवर नाही. तुम्ही निर्णय घ्या. जे काही चाललं आहे, ते दिवस जातील. ठामपणे उभे राहा, जे होईल ते होईल. हरायचं नाही, निर्णय घ्यायचा आहे.
निर्णय घेताना घाबरू नका. लक्षात ठेवा चुकीचा निर्णय देखील, निर्णय न घेण्यापेक्षाही कितीतरी महत्वाचा आहे. यात काही न करण्याचा अपराध आपल्याला आयुष्यभर सतावतो. राजस्थानच्या चित्रा दुबे यांनी आपली मनातली खंत डिअर जिंदगीशी बोलून दाखवली होती.
यानंतर जवळ जवळ दीड वर्षांनी, त्यांनी पुन्हा लिहिलं - 'डिअर जिंदगीने दिलेली प्रेरणा महत्वाची ठरली, आभार. असं अनेक वेळा होतं की आपण निर्णयाच्या खूप जवळ असतो. पण निर्णय नाही घेऊ शकत. माझ्यासोबतही असं काहीसं होत होतं. अशा वेळी तुम्ही एका अंधारलेल्या खोलीत दिवा लावला. मी फारकत घेण्याचा निर्णय घेतला. अडचणी आल्या, त्रास झाला, धमक्यांचा सामना करावा लागला, पण आज मी आनंदी आहे, स्वतंत्र आपल्या पायावर उभी आहे'.
ही महिला पुढे लिहिते, हे दिवस देखील जातील, ही गोष्ट आशा आणि स्नेहपूर्ण वाटते, यात जीवनाविषयी खूप खोलपर्यंत आस्था आहे. मला हे एवढं आवडलं की, तेव्हापासून हे माझं व्हॉटसअप स्टेटस आहे. चित्राजी यांनी जे धैर्य दाखवलं, त्याला खरंच सलाम. अशी नाती ज्यात जीवनाचा श्वास कोंडला जातो, यात अडकून राहणं व्यर्थ आहे. कोणतीही परंपरा, बंधन जीवनापेक्षा मोठं नाही. जीवनावर कुणाचं ओझं होवू देऊ नका.
जीवन सुंदर गोष्टींनी भरलेलं आहे, पण धोकायदायक वळणांचा घाट आहे. यात अनेक धोके आहेत, वेगवान वळणं आहेत. काही ठिकाणी नागमोडी वळणं आहेत. शेवटी या प्रवासात एक आनंद आहे. म्हणून प्रवासात रस्ता कसाही आला, तरी प्रवास सुरू ठेवा, मागे परतू नका, घाबरू नका, हरू नका... एवढंच सांगायचंय, दिसं येतील, दिसं जातील...
चित्राजींच्या जीवनातील दु:खाचे काळे ढग नाहीशे झाले आहेत. जीवनाविषयी असलेली आस्था नेहमीच असली पाहिजे, यासाठी मी एक पुस्तक वाचण्याची विनंती सर्वांना नेहमी करत असतो. अमृतलाल नागर यांची अमर रचना ‘नाच्यौ बहुत गोपाल’. अॅमेझॉनवर सहज मिळते. राजपाल प्रकाशनने ‘नाच्यौ बहुत गोपाल’ हे पुस्तक छापलं आहे, किंमत केवळ २४५ रूपये आहे.
जीवनाच्या रागात कुठेही लय लूट असेल, तर जीवन एकजीव होतं. ज्या कोणत्या वाचकाला हे पुस्तक आवडलं नाही, त्याचे पैसे मी देण्याची गॅरंटी घेतो. हे पुस्तक जीवनाविषयी एकदम गंगासारखी आस्था असलेलं आहे. तर यापुढे जीवनाच्या प्रवासात, कोणताही अडचणींचा रस्ता येईल. तर एवढंच लक्षात ठेवा, दिसं येतील... दिसं जातील....!
हिंदी में पढिए डियर जिंदगी: यकीन रखें, यह भी गुजर जाएगा…