दयाशंकर मिश्र : तुम्ही कधी यावर आत्मपरीक्षण केलंय का, की तुमच्या चुकीच्या वागण्याचा सर्वात जास्त त्रास कुणाला होतोय. तुमची कोणती गोष्ट, जास्तच जास्त लोकांना खटकते. कोणती गोष्ट आहे, जी मनाला लागतेय. असं काय आहे, ज्यात नात्यांत अंतर प़डतंय, नाती विखुरल्याने जीवनभर आपण जवळच्यांपासून लांब आहोत.
तुम्ही १० वर्ष मागे जाऊन विचार करा. जेव्हा मोबाईल फोनची किणकिण नव्हती. कुणाशी तरी बोलण्यासाठी वाट पाहावी लागत होती. बोलण्याआधी कुणाशी काय बोलावं, सुरूवात कशी करावी, हे शिकावं लागत होतं. आपले नातेसंबंध बोलण्यावर टीकून होते. 'बोले तसा चाले, त्याची वंदावी पाऊले', या प्रमाणे लोक बोलण्यावर कायम राहत होते. अशा व्यक्तींना दिलदार, ईमानदार, प्रतिष्ठीत मानलं जात होतं.
असं सुरू असताना आपल्या जीवनात, मोबाईल, चॅटिंग, तंत्रज्ञान आलं. 'फ्री टॉक टॉइम'मुळे हे आणखी वाढलं. आता एवढ्या गोष्टी, सकाळ, संध्याकाळ एवढ्या वेळेस बोलल्या जाऊ लागल्या की, आपण सकाळी काय बोललो, हे संध्याकाळी विसरू लागलो आहोत. जेव्हा आपण स्वत:च विसरलो की, आपण काय बोललो होतो, तेव्हा आपण ही जबाबदारी दुसऱ्यावर झटकतो, तेव्हा हे निसर्गाच्या नियमाकडे पाठ फिरवण्यासारखं आहे.
आपल्यातील जे हिंदीत शिकत कॉलेजपर्यंत पोहोचले, त्यांना चंद्रधर शर्मा गुलेरी यांची गोष्ट, 'उसने कहा था', ही गोष्ट आठवत असेल. कहाणीच्या वेगळ्या गोष्टींवर धूळ साचू शकते. पण प्रेक्षकांच्या मनात नेहमी हे बसून असतं. यातील सुभेदारीणबाईने नायकाला आपल्या पती आणि मुलाच्या रक्षणासाठी दिलेलं वचन. आपल्या मनात कुणाविषयी आलेली काळजीची भावना कशी वेळेवर पार पाडता येईल, हा 'उसने कहा था'मधील सार होता.
डिअर जिंदगीमध्ये 'उसने कहा था'चा उपयोग आपण अशा विचाराला मजबूत करण्यासाठी केला, ज्याचं नाव विश्वास आहे, प्रेम, आत्मियताच्या रस्त्यावर चालून, तुम्ही ती गोष्ट पार करू शकता. जी गोष्ट आपण सहज भावनेने, पण मनापासून खोलपर्यंत जाऊन केली होती.
दिवस जात असतात, आपण जीवनाच्या धकाधकीत सामिल होतो, स्वत:ला जीवनाच्या संघर्षात झोकून देतो. जेव्हा आपण संघर्षाच्या तपिशमध्ये स्वत:ला पाहत असतो, तेव्हा सर्व गोष्टींची जाणीव असते, पण जेव्हा आपण संघर्ष करून एका उंचीवर पोहोचतो, तेव्हा आपण ते वचन, ध्येय आणि हेतू, आणि जे बोललो त्यापासून दूर जात असतो.
येथे ज्यांनी जीवनाच्या वळणावर दुसऱ्यांना काही वचन दिलं होतं, जो अलिखित करार आपल्याशी आपल्याचं लोकांचा होता, त्या कराराचं काय झालं. आम्ही जीवनात दिलेलं वचन, आश्वासनं, पुढच्या वळणावर विसरून, अंतर्मनात शांततेचा शोध घेत आहोत.
या तर अशा गोष्टी आहेत, ज्या रोजच आपल्या आयुष्यात घडत असतात, पण जीवनाची शांती, सुखासाठी जर आम्ही एवढं जरी केलं की, आठवड्यातून एक दिवस आपण त्या दिवसांसाठी काढावेत, जे आपल्याला मागच्या दिवसांची आठवण करून देतील, ही आठवण 'रिटर्न गिफ्ट'पेक्षा कमी नसेल.
जीवन अनेक प्रकारचे स्पीड ब्रेकर, डोक्यातील 'गतिरोधक', नात्यांमधील गैरसमजात थांबली आहे. हे सर्व एकेदिवशी आपल्या मनात घर करतात. जेव्हा हे जास्तच होतं, तेव्हा या संकटाला डॉक्टरी भाषेत हाट अटॅक म्हटलं जातं.
डॉक्टर आपलं काम जाणतात, पण त्यांची काही मदत, आपण नक्की करू शकतो. आपल्या आठवणींच्या खिडकीत लागलेलं जाळ काढून टाका. जीवनाला उदार, सरळ, आणि स्नेही बनवा. तुमची कामं पूर्ण करा, यासाठी दुसऱ्यांना जे सांगितलं, ते देखील सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा.
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)