Vegan डाएट फॉलो करत खायची फळं, ज्यूस अन् कच्चं अन्न; सोशल मीडिया स्टारचा अखेर मृत्यू

Vegan Raw Food : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेल्या झान्ना सॅमसोनोव्हा तिच्या अनेक सोशल मीडिया अकाऊंटवर रॉ फूड डाएट बद्दल सातत्याने माहिती द्यायची. अनेक वर्षे झान्ना केवळ शाकाहारी कच्चे अन्नच खात होती. अखेर तिला मृत्यूनं गाठलं आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 1, 2023, 05:02 PM IST
Vegan डाएट फॉलो करत खायची फळं, ज्यूस अन् कच्चं अन्न; सोशल मीडिया स्टारचा अखेर मृत्यू title=
(फोटो सौजन्य - Reuters)

Shocking News : गेल्या काही दिवसांपासून शाकाहार (vegetarian) आणि मांसाहर (Non Veg) अशी जोरदार चर्चा सुरु झालीय. अशातच लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शाकाहारी आहाराचा भरपूर वापर करू लागले आहेत. मात्र, प्रत्येक व्यक्तीची क्षमता ही वेगवेगळी असते. तसेच प्रत्येक व्यक्तीला तंदुरुस्त राहण्यासाठी काही खास गोष्टींची गरज असते. फूड इन्फ्लुएंसर झान्ना सॅमसोनोव्हा (Zhanna Samsonova) नावाची एक तरुणी अशाच प्रकारे केवळ शाकाहारी पदार्थ खाऊन जगत होती. सातत्याने केवळ कच्चा आहार करणाऱ्या झान्ना सॅमसोनोव्हा धक्कादायक मृत्यू झाला आहे. भुकेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या झान्ना सॅमसोनोव्हा अनेकजण फॉलो करायचे. अनेक वर्षांपासून ती फक्त कच्च्या भाज्या आणि फळे खात होती. रशियात राहणाऱ्या सॅमसोनोव्हानेही सोशल मीडियावर कच्चे अन्न खायला सांगायची. सॅमसोनोव्हा फक्त परदेशी फळांवर जगत होती. झान्ना अनेकदा सोशल मीडियावर शाकाहारी रॉ फूडची जाहिरात करताना दिसली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, शाकाहारी कच्च्या अन्न आहारामुळे झान्ना उपासमारीची शिकार झाली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

सोशल मीडियावर होते बरेच चाहते

टिकटॉकपासून फेसबुक आणि इंन्स्टाग्रामपर्यंत सर्वत्र सॅमसोनोव्हा तिच्या 'रॉ फूड डाएट'बद्दल सांगताना दिसायची. तिच्या लाखो चाहत्यांमध्ये Zhanna D’Art या नावाने ती प्रसिद्ध होती. काही महिन्यांपूर्वी सॅमसोनोव्हाची अचानक तिची तब्येत बिघडू लागली. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण 21 जुलैला तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

कशामुळे झाला मृत्यू?

सॅमसोनोव्हाच्या एका मित्राने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी श्रीलंका दौऱ्यादरम्यान तिची प्रकृती खालावली होती. ती खूप सुस्त झाली होती. तिचे पाय सुजले होते. तिला उपचारासाठी घरी पाठवण्यात आले होते. मात्र ती पुन्हा तिथून बाहेर पडली होती. जेव्हा आम्ही तिला फुकेतमध्ये पाहिले तेव्हा तिची परिस्थिती आणखी भयानक झाली होती.

अनेक वर्षे फक्त खायची फळे

सॅमसोनोव्हाच्या आईने सांगितले की, सॅमसोनोव्हाला कॉलरासारख्या आजाराने मृत्यू झाला आहे. मात्र तिच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप समोर आले नाही. मात्र तिच्या आईने सांगितले की, असे वाटते की जास्त थकवा आल्याने आणि पूर्णपणे कच्चे शाकाहारी अन्न खाल्ल्याने तिच्या शरीरावर खूप ताण आला होता आणि यामुळे त्याचा मृत्यू झाला. सॅमसोनोव्हा फक्त फळे, फळांचा रस, सूर्यफुलाच्या बिया जेवण म्हणून खात होती. सोनोव्हाच्या आणखी एका मैत्रिणीने सांगितले की, ती गेल्या सात वर्षांपासून फणस खात होती. सॅमसोनोव्हा मित्रांच्या मते, तिच्या मृत्यूचे कारण शाकाहारी कच्चे अन्न आहे, ज्यामुळे तिचे शरीर अशक्त झाले होते.