झिरो कोव्हीड पॉलिसी फेल, कोरोनापुढे चिनी लसीची पोलखोल

कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन, लोकं घरात कैद, व्यापार ठप्प

Updated: Mar 28, 2022, 02:25 PM IST
झिरो कोव्हीड पॉलिसी फेल, कोरोनापुढे चिनी लसीची पोलखोल  title=

Corona in China : चीनच्या (China) वुहान शहरातून जगभर पसरलेल्या कोरोनानं  (Corona) चीनमध्ये पुन्हा एकदा कहर सुरू केला आहे. कोरोनामुळे इथल्या 5 कोटी जनतेला पुन्हा एकदा घरात कैद रहावं लागतंय. दररोज कोरोनाचे रूग्ण वाढत असल्यानं चीनची झिरो कोव्हीड पॉलिसी (Zero Covid Policy) फेल झाल्यात जमा आहे. 

विशेष म्हणजे चीनमध्ये जवळपास 100 टक्के लसीकरण  (Vaccination) पूर्ण झालं आहे. अशातही कोरोनानं उचल खाल्ल्यानं लोकांमधून संतापाची लाट उसळलीय. सोशल मीडियातून लोक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करतायेत. बाजार बंद असल्यानं अनेक उद्योग ठप्प आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही नाराजीचा सूर आहे. 

कोरोनाचा सामना करण्यासोबत जनतेचा रोष दूर करणं असं दुहेरी आव्हान आता चीन सरकारसमोर आहे. कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर चीनकडे आता लॉकडाऊन हा एकच पर्याय उरला आहे. मोठी शहरे बंद झाली आहेत, लोकांना त्यांच्या घरात 'कैद' करण्यात आलं आहे, बाजारपेठा बंद आहेत आणि उद्योगांची साखळी तुटली आहे.  

दुसरीकडे युरोपमध्येही अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने पसरत आहेत. स्कॉटलंड आणि वेल्समध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे, तर इंग्लंडमध्ये कोविड प्रकरणं विक्रमी पातळीच्या जवळ आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये सुमारे 4.2 दशलक्ष लोकांना संसर्ग झाला होता. तर जर्मनीमध्ये विक्रमी 2,96,498 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

जगभरात आतापर्यंत कोरोनाची 47.86 इतकी आकडेवारी नोंदवली गेली आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 61.1 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन सरकार कोरोनाच्या आकडेवारीची लपवाछपवी करत असल्याने चीनमध्ये कोरोनामुळे नेमके किती मृत्यू झाले याची नोंद नाही.