आश्चर्यकारक! सात वर्षांच्या मुलाचे 'एट पॅक्स अॅब्स'

स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण काय काय करतो... 'सिक्स पॅक्स अॅब्स' बनवण्यासाठी डाएट आणि खूप सारी मेहनत करावी लागते... परंतु, चीनच्या एक सात वर्षीय मुलगा 'एट पॅक्स अॅब्स' बनवण्यात यशस्वी ठरलाय.

Updated: Jul 6, 2017, 05:34 PM IST
आश्चर्यकारक! सात वर्षांच्या मुलाचे 'एट पॅक्स अॅब्स' title=

मुंबई : स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण काय काय करतो... 'सिक्स पॅक्स अॅब्स' बनवण्यासाठी डाएट आणि खूप सारी मेहनत करावी लागते... परंतु, चीनच्या एक सात वर्षीय मुलगा 'एट पॅक्स अॅब्स' बनवण्यात यशस्वी ठरलाय.

'पीपल्स डेली चायना'नं आपल्या फेसबुकवर या मुलाचा फोटो पोस्ट केलाय. हा फोटो मोठ्या तेजीत वायरल होताना दिसतोय. 

चेन यी असं या मुलाचं नाव आहे. फिटनेसकडे तो अगदी लहान वयातच आकर्षित झालाय. त्याला 'मसल बॉय' म्हणूनही ओळखलं जातंय. गेल्या दोन वर्षांपासून तो फिटनेस ट्रेनिंग घेतोय. 

सध्या तो एका जिमनास्टिक स्कूलमध्ये पाच दिवस राहतो आणि संपूर्ण वेळ केवळ ट्रेनिंगसाठी देतो. केवळ विकेंडला तो आपल्या घरी जातो. त्याच्या वयाच्या १२ मुलांना जेवढं अन्न लागतं तेवढा तो एकटाच खातो.  

चेन यी च्या आईच्या म्हणण्यानुसार, तो जन्मापासूनच स्ट्राँग आहे. केवळ ११ महिन्यांचा असतानाच तो चालायलाही लागला होता.

एवढ्या लहान वयात चेननं सहा गोल्ड मेडल आणि एक सिल्वर मेडलही पटकावलंय.