Year Ender 2023 : 'या' मुलीचा VIDEO 2023 मध्ये सर्वाधिक पाहिला गेला, नेमकं आहेत तरी काय यात?

Year Ender 2023 : या तरुणीकडे पाहून तुम्हालाही वाटेल की, असं काय होतं हिच्या व्हिडीओमध्ये की 2023 मध्ये सर्वाधिक व्ह्यूज हिच्या व्हिडीओला मिळाला आहे. तुम्ही पाहा का हा व्हिडीओ? 

नेहा चौधरी | Updated: Dec 10, 2023, 03:39 PM IST
Year Ender 2023 : 'या' मुलीचा VIDEO 2023 मध्ये सर्वाधिक पाहिला गेला, नेमकं आहेत तरी काय यात? title=
Year Ender 2023 This girl VIDEO is the most viewed in 2023 what exactly is in the video trending

Year Ender 2023 : या वर्षाला निरोप देताना मनात एक प्रश्न येतो. या वर्षात काय काय घडलं. हे वर्ष राजकारण असो, बॉलिवूडसह सोशल मीडियावरही अनेक व्हिडीओमुळे गाजलं. सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल झाले. त्यातील काही व्हिडीओ ट्रेंडिंग होते. जेव्हा आपण सोशल मीडियाचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येतं की, या वर्षी 2023 मध्ये सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ पाहिला गेला? (Year Ender 2023 This girl VIDEO is the most viewed in 2023 what exactly is in the video trending)

'या' मुलीचा VIDEO 2023 मध्ये सर्वाधिक पाहिला गेला

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर या वर्षी सर्वाधिक पाहिला गेला. असं काय आहे या व्हिडीओमध्ये की या व्हिडीओला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले. 

नेमकं आहेत तरी काय या व्हिडीओमध्ये?

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहिला मिळतात. सौंदर्य प्रसाधन आणि सौंदर्यात भर पडावी म्हणून अनेक घरगुती उपाय सांगण्यात येतात. केस, त्वचा, मेकअप यासाठी सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. मेकअपमुळे अनेक मुलींना ओळखणं अवघड असतं. इथे जेव्हा आपण रंगभेद विसरुन सर्व समान आहे ही भावना रुजवताना दिसतो. तिथे या मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. 

हेसुद्धा वाचा - Year Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending

टिकटॉक डेटानुसार मॉडेल न्याडोली डेंगच्या मेकअप ट्युटोरियलला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ या वर्षी मार्चमध्ये अपलोड केला गेला होता. या व्हिडीओला 504 दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. मॉडेल न्याडोलीने हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरही शेअर केला होता. यात तिने विविध मेकअप उत्पादने वापरून मेकअप करण्याचं तंत्र सांगितलं आहे. त्याशिवाय कोणत्या कंपनीचं उत्पादन तिने वापरलं आहे त्याबद्दल तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nyadollie (@nyadolliee)

या व्हिडीओला सर्वाधिक व्ह्यूजसोबत कमेंट बॉक्समध्येही सर्वाधिक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. नेटकऱ्यांनी मॉडेल न्याडोलीचं खूप कौतुक केलं आहे. तिने या व्हिडीओमध्ये ज्या प्रकारे मेकअप केलं आहे ते पाहून नेटकरी खूष झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ब्लॅक ब्यूटी अशी उपमा दिली आहे. तर काही लोकांनी म्हटलं आहे की, तिचा रंग सर्वात सुंदर रंग आहे.