या देशात सापडला जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा, आता होणार मालामाल

आफ्रिकेच्या बोत्सवाना  (Botswana) देशात दुर्मिळ हिरा (Diamond) सापडला आहे.  

Updated: Jun 17, 2021, 06:17 PM IST
या देशात सापडला जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा, आता होणार मालामाल title=

गॅबोरोन : आफ्रिकेच्या बोत्सवाना  (Botswana) देशात दुर्मिळ हिरा (Diamond) सापडला आहे. हा जगातील तिसरा मोठा हिरा असल्याचे सांगितले जात आहे. हिरा शोधणार्‍या कंपनी देब्सवानाने (Debswana) सांगितले की, हा आश्चर्यकारक हिरा 1,098 कॅरेटचा आहे. हा हिरा 1 जून रोजी उत्खननात सापडला होता. आता अलिकडेच तो अध्यक्ष मोकगवेत्‍सी मसीसी (Mokgweetsi Masisi) यांना दाखविण्यात आला आहे.

आशेचा किरण घेऊन आला Diamond

देब्सवानाचे (Debswana) व्यवस्थापकीय संचालक लियनेटे आर्मस्ट्राँग  (Lynette Armstrong) म्हणाले की, गुणवत्तेच्या बाबतीत हा जगातील तिसरा मोठा हिरा आहे. ते पुढे म्हणाले की हिरा उद्योग आणि बोत्‍सवानासाठी हा दुर्मिळ आणि विलक्षण दगड खूप महत्वाचा आहे. आर्मस्ट्राँग म्हणाले की, हा हिरा एक प्रकारे आपल्या संघर्षशील देशासाठी आशेचा किरण आणला आहे.

आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध

देब्सवानाचेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कंपनीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध आहे. देब्सवाना हे बोत्सवानाचे सरकार आणि जगातील सर्वात मोठी डायमंड कंपनी डी बीयर्समधील संयुक्त व्हेंचर आहे. यापूर्वी, 1905 मध्ये, जगातील सर्वात मोठा हिरा दक्षिण आफ्रिकेत आढळला होता, जो सुमारे 3,106 कॅरेट होता.

दुसरा मोठा हिरा 2015 मध्ये सापडला

दरम्यान, जगातील दुसर्‍या क्रमांकाचा 1109 कॅरेटचा हिरा2015 मध्ये ईशान्य बोत्सवानामध्ये मिळाला. तो टेनिस बॉलच्या आकाराच होता. आता येथे तिसरा सर्वात मोठा हिरा सापडला आहे. सध्या हा हिरा कोणाला विकला गेला नाही. महत्त्वाचे म्हणजे बोत्सवाना ही हीरा उत्पादक प्रमुख देशांमध्ये गणली जाते.