जगातला सर्वात महागडा चहा; चहाच्या एका घोटाची किंमत कोट्यावधींच्या घरात

जगातील निम्म्याहून अधिक लोकं चहाप्रेमी आहेत. 

Updated: Jun 17, 2021, 01:59 PM IST
जगातला सर्वात महागडा चहा; चहाच्या एका घोटाची किंमत कोट्यावधींच्या घरात title=

मुंबई : जगातील निम्म्याहून अधिक लोकं चहाप्रेमी आहेत. आपल्या देशात तुम्हाला चहा पिण्याचे अनेक शौकीन असलेले लोक पाहायला मिळतील. काही जणांच्या तर दिवसाची सुरुवातच चहाच्या घोटाने होते. कदाचित तुम्हाला देखील चहा प्यायला खूप आवडत असेल. मात्र तुम्ही कधी जगातील महागड्या चहाबद्दल ऐकलं आहे का? तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जगातील महागड्या चहाबद्दल...

आजवर तुम्ही बर्‍याच प्रकारचे चहा प्यायला असाल.. जसं ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी इत्यादी... मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा चहाबद्दल सांगणार आहोत ज्याची चव नव्हे तर किंमत जगभरात प्रसिद्ध आहे. 'द होंग पाओ' हे जगातील सर्वात महागड्या चहाचं नाव आहे. आणि एक ग्रॅमसाठी या चहाला 1400 डॉलर इतकी किंमत मोजावी लागते.

चीनमधील फुझियान या छोट्याशा शहरातील वाईसन भागात आढळणारा 'द होंग पाओ' चहा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानला जातो. एका विशिष्ट झाडापासून तयार केलेल्या, 'द हाँग पाओ टी'ते अनेक फायदे मानले जाते, ज्यामुळे याची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे. या चहाच्या एका घोटाची किंमत 9 कोटी रुपये आहे.

जर तुम्हाला हा चहा एक पॉटमध्ये हवा असेल तर तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागतात. पॉटमधून चहा हवा असल्यास तुम्हाला १०,००० डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करावा लागेल.

चहाची पानं म्यूझियममध्ये ठेवण्यात आली आहेत

'द होंग पाओ' चहा जगातील सर्वात महाग आहे (जगातला सर्वात महाग चहा) कारण ज्या झाडापासून हा चहा बनवला जातो, ते झाड आता अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत, हा प्राचीन चहा अमूल्य आहे असं म्हणतात. ज्या झाडापासून हा चहा बनला होता ते झाड डोंगरावर 300 वर्षांपर्यंत सापडलं. 'द हाँग पाओ' चहा तयार करणारे शेवटचं झाड 2005 साली मरण पावलं असं म्हणतात.