रशिया : शास्त्रज्ञ संपूर्ण विश्वात पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध घेतला जातोय. परंतु आपल्याशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचं सांगणारा ठोस पुरावा आजपर्यंत सापडलेला नाही. पण कधी-कधी अशा घटना घडतात, ज्यामुळे असं वाटतं की, मानव सोडून इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच एका अद्भुत रेडिओ स्टेशनबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल असं म्हटलं जातं की, तिथून गूढ आवाज ऐकू येतात.
हे रेडिओ स्टेशन रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरापासून थोडं दूर एका निर्जन भागात आहे. या रेडिओ स्टेशनवरून ठराविक अंतराने काही प्रक्षेपण होत असतं, त्यानंतर कोणत्याही रेडिओ स्टेशनवरून प्रक्षेपण बंद होताच, त्याचप्रमाणे या स्टेशनवरूनही आवाज ऐकू येऊ लागतो. या रेडिओ स्टेशनचं असं विचित्र प्रक्षेपण गेली अनेक दशकं सुरू आहे.
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हे रेडिओ स्टेशन जगभर ऐकलं जातं, परंतु हे रेडिओ स्टेशन कोण चालवतं याची कोणालाही माहिती नाही. या रेडिओ स्टेशनचे नाव कोणत्याही रेकॉर्डमध्ये नोंदवलेलं नाही. एवढंच नाही तर सरकारही याबाबत काहीही जाणून घेण्यास नकार देतं.
आता अशा गूढ स्थानकाचं नावही विचित्रच आहे. या रेडिओ स्टेशनचे नाव MDZhB आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये ते 'द बजर' म्हणून ओळखलं जातं. गेल्या 35 वर्षांपासून हे रेडिओ स्टेशन जगाला विचित्र आवाज ऐकवत आहे, परंतु आजपर्यंत कोणीही त्याचा उद्देश डीकोड करू शकलं नाही.