Viral: पतीशी भांडण करून पत्नी घराबाहेर पडली, पण घरी परतली ती करोडपती होऊन... असं नेमकं काय घडलं वाचा

Husand Wife Lottery: पती पत्नींमध्ये भांडणं होणं फारच स्वाभाविक आहे. परंतु अशी भांडणं सुरू होण्याची कारणं काय असतात हेही कळतं नाही आणि ती मिटण्याची (Husband Wife Fight) कारणंही आपल्याला अनेकदा कळंतही नाहीत.

Updated: Dec 24, 2022, 06:51 PM IST
Viral: पतीशी भांडण करून पत्नी घराबाहेर पडली, पण घरी परतली ती करोडपती होऊन... असं नेमकं काय घडलं वाचा title=
husband wife news

Husand Wife Lottery: पती पत्नींमध्ये भांडणं होणं फारच स्वाभाविक आहे. परंतु अशी भांडणं सुरू होण्याची कारणं काय असतात हेही कळतं नाही आणि ती मिटण्याची (Husband Wife Fight) कारणंही आपल्याला अनेकदा कळंतही नाहीत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे ज्यात एका जोडप्याचं भांडणं झालं आणि त्या भांडणं लगेचच मिटंल पण ते कसं मिटलं हे तुम्हाला कळल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पती-पत्नीमधील भांडणं ही सोशल मीडियावरही (Husband Wife Fight Social Media) व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या भांडणात भांडण झाल्यावर बायको बाजारात गेली आणि रागाच्या भरात ती बाजारातून लॉटरीचं तिकीट आणि दुसऱ्यादिवशी घडलेला प्रकार पाहून त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला पतीनं बाजारात जाण्यासाठी नकार दिला म्हणून पत्नी बाजारात गेली आणि त्या दोघांचे आयुष्यचं बदलून गेले. तेव्हा जाणून घेऊया की नक्की झालं तरी काय? (world viral news husband wife fight wife gets 32 crore lottery)

भांडण झालं आणि मग... 

ही घटना अमेरिकेतील मिशिगनमधील आहे. येथे राहणाऱ्या एका जोडप्यांमध्ये एका लहानश्या गोष्टीवरून भांडणं झालं. भांडण झाल्याचं कारण होतं की पत्नीला बाजारातून काही गोष्टी हव्या होत्या. परंतु पती मात्र सारखा सारखा नकार देत होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये बाताबाती झाली. शेवटी हार मानून चिडून पत्नी स्वत:हूनच बाजारात गेली. पतीनं बाजारात जायला नकार दिला होता त्यातून मी नुकताच बाजारातून आलो आहे उद्या जाईन असा वारंवार सांगत होता. त्या दोघांमधला वाद इतका विकोपाला गेला की शेवटी रागाच्या भरात ती घराबाहेर पडली. 

चिडून पत्नी लॉटरीचं तिकीट घ्यायला गेली ती ते विकतही घेतलं. ती रागाच्या भरात पतीला आता मी कधीच घरी परत येणार नाही असं सांगून बाहेर पडली. व्हा ती बाजारात पोहोचली तेव्हा तिला काय वाटले हे तिला कळेना. तिने लॉटरीचे तिकीट घेतले. पण पुढे जे झालं ते वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हे तिकीट तिचं नशीब बदलणार ठरलं बहूधा हे तिलाही माहिती नव्हतं. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल पण त्या महिलेला या लॉटरीतून चक्क 32 कोटी रूपये मिळाले आणि हे ऐकून स्वत: ती महिलाही चक्रावून गेली. 

 

असं मिटलं भांडणं 

घरी आल्या आल्या तिनं हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितलं आणि मीडिया रिपोर्टनुसार तिकीट खरेदी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लॉटरी जिंकल्याचं तिला कळलं आणि तिनं ही गुड न्यूज आपल्या पतीला सांगितली. सध्या दोघेही खूश असून त्यांचे भांडणंही मिटले आहे.