China H3N8 Bird Flu: एकीकडे जगात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामुळे संपूर्ण जगाचे टेन्शन वाढले आहे. त्यातच आता चीनमध्ये आणखी एका भयानक व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. H3N8 बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे पहिल्यांदाच माणसाचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंता वाढली आहे.
आधीच कोरोनाने पुन्हा एकदा जगाचं कंबरडं मोडलं होत. जगात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होत आहे.त्यानंतर आता H3N2 व्हायरसनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. H3N8 बर्ड फ्लूमुळे पहिल्या मानवी मृत्यूची नोंद झाली आहे. चीनमध्ये बर्ड फ्लूनं एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माणसांमध्ये बर्ड फ्लूचं संक्रमण होण्याचा हा पहिलाच प्रकार नसला. तरी बर्ड फ्लूमुळे मानवी मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनं याची पुष्टी केली आहे.
चीनमध्ये H3N8 नावाचा बर्ड फ्लू व्हायरस आढळून आला आहे. H3N8 बर्ल्ड फ्लू व्हायरसमुळे एका 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिला चीनच्या गुंगडाँग प्रांतात राहणारी आहे. मृत महिला निमोनियानं पीडित असल्याचीही माहिती समोर आली आहे. चीनमध्ये एकूण तिघांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचेही समोर आले आहे. तीनही रुग्ण पोल्ट्रीच्या संपर्कात आले होते. पक्ष्यांसह घोड्यामध्येही या व्हायरसची लक्षणं आढळून आली आहेत.
आतापर्यंत बर्ड फ्लू हा केवळ पक्ष्यांनाच संक्रमित करतो असं मानलं जात होतं. मात्र, चीनमध्ये बर्ड फ्लूची लागण चक्क माणसांना होऊन त्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. त्यामुळे जगावर आणखी एक नवं संकट येऊन ठेपल आहे. बर्ड फ्लूच्या या व्हायरसची माणसांना लागण होणं हे दुर्मिळ मानलं जात आहे.
यापूर्वी चीनमध्ये कोरोनाची चौथी लाट आली असताना हेनान प्रांतात एका चार वर्षांच्या मुलामध्ये बर्ड फ्लूचा H3N8 स्ट्रेन आढळला होता. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं ही बाब मान्य केली होती. ताप, कफ, खोकला, नाक वाहणं, डोकेदुखी, घशाला सूज, जुलाब, ओटीपोटात दुखणं, श्वास घ्यायला त्रास, डोळ्याला रांजणवाडी अशी लक्षणं असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा असे अवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.