Metroत चढला, अंथरुण पसरलं आणि गाढ झोपी गेला... प्रवासी हैराण Video व्हायरल

Man Sleeping In Metro: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोत बिकनी घालून प्रवास करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

Updated: Apr 12, 2023, 05:06 PM IST
Metroत चढला, अंथरुण पसरलं आणि गाढ झोपी गेला... प्रवासी हैराण Video व्हायरल title=

Sleeping In Metro : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काही जणं कोणत्याही थराला जातात. लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची आजच्या तरुणपिढीची तयारी असते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'दिल्ली मेट्रो गर्ल'चा (Delhi Metro Girl) व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या मुलीने चक्क बिकनी परिधान करुन मेट्रोतून प्रवास केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडला. काही युजर्सने त्या मुलीच्या ड्रेसवर टीका केली तर काही जणांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं. यावर कोणते कपडे घालावेत आणि घालू नयेत याचं आपल्याला स्वतंत्र्य असल्याचं स्पष्टीकरण त्या मुलीने दिलंय.

तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
मेट्रोतला हा ट्रेंड केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहे. न्यूयॉर्क मेट्रोतल्या एका तरुणाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओत हा तरुण धावत्या मेट्रोत चक्क अंथरुण पसरून झोपलेला दिसतोय. प्रिन्स असं त्या तरुणाचं नाव असून तो कंटेंट क्रिएटर आहे. हा व्हिडिओ त्याने आपल्या YouTube हँडलवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 5 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. 

काय आहेत व्हायरल व्हिडिओत?
व्हिडिओत एक तरुण बॅग घेऊन मेट्रोत चढतो आणि एका सीटवर जाऊन बसतो. काही वेळाने बॅगेतून तो हवा भरणारी गादी काढतो, त्यात हवा भरुन ती फुगतो आणि सीटच्या मधल्या जागेत अंथरतो. इतकंच काय तर कपडे काढत तो अंगावर चादर घेऊन आरामात झोपी जातो. त्या तरुणाचे अतरंगी प्रकार पाहून मेट्रोतले इतर प्रवासी हैराण झालेले दिसतायत. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर युझर्स अनेक कमेंट करत आहेत. काही युजर्सने हा प्रकार मुर्खपणाचं असल्याचं सांगत त्या तरुणाला सुनावलं आहे. तर काही युजर्सने तरुणाच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. 

मेट्रोत आंघोळ करतानाचा व्हिडिओ?
काही दिवसांपूर्वी मेट्रोत आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओत एक तरुण सुटकेस घेऊन मेट्रोत शिरतो. त्यानंतर तो अचानक आपले कपडे उतरवतो. त्यानंतर सुटकेस मध्ये पाणी टाकून स्पंजने आपल्या अंगाला साबण लावताना दिसत आहे. त्या तरुणाच्या हातात एक भांडं आहे, त्याने तो आंघोळ करताना दिसतोय. तरुणाचे हे अंतरंगी कारनामे पाहून मेट्रोत बसलेले इतर प्रवासी चांगलेच घाबरलेले. काही प्रवासी तर बसल्या जागेवरुन उठून दुसऱ्या जागेवर बसले. तर काही प्रवाशांनी याचे व्हिडिओ बनवले. 

ऋदम चनाना झाली व्हायरल
दिल्ली मेट्रो गर्ल नावाने काही दिवसांपूर्वी एक मुलगी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. ऋदम चनाना असं या मुलीचं नाव असून बिकनी घलून तिने मेट्रोतून प्रवास केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.