वोदाब्बे: जगभरात अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. काही परंपरा या जरा अजबच असतात नाही. पण प्रत्येक परंपरेमागे काहीतरी पूर्वजांची विचारधारणा असल्यानं त्या वर्षानुवर्ष पुढे चालत राहतात. जगभरात लग्न ही एक पवित्र बंधन आणि नातं मानलं जातं. विविध धर्म आपापल्या श्रद्धा आणि विधींनुसार लग्न करतात. पण लग्न करायचं असेल तर दुसऱ्याची बायको चोरावी लागते.
अशी अजब परंपरा कधी ऐकली आहे का? इथे लग्न करण्यासाठी मुलाला आधी दुसऱ्याची बायको चोरावी लागते. महत्त्वाचं म्हणजे कोणालाही न कळता ही चोरी होणं महत्त्वाचं आहे तरच पळवून नेलेल्या तरुणीसोबत लग्न करता येतं. नेमकी ही अजब परंपरा काय आणि कोणत्या देशात आहे जाणून घेऊया.
पश्चिम आफ्रिकेत राहणारी वोदाब्बे या जातीमध्ये ही अजब प्रथा आहे. इथल्या लग्नाच्या परंपरा थोड्या अजबच आहेत आणि अश्चर्यचकीत करणाऱ्या देखील आहेत. लग्न करण्याआधी पुरुषांना दुसऱ्या पुरुषाची बायको पळवून न्यावी लागते.अशा प्रकारे विवाह करणे ही या जमातीची एक वेगळी ओळख आहे.
डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, पण यात गोम अशी आहे की ज्याला लग्न करायचं आहे त्याच्या कुटुंबाची समंती दुसरं लग्न करण्यासाठी हवी. पहिली पत्नी नसेल तर दुसऱ्या लग्नासाठी ही परंपरा आहे. पहिलं लग्न झालेल्या पुरुषांना या परंपरेत सहभागी होता येत नाही. मात्र ज्यांचं दुसरं लग्न आहे अशा पुरुषांसाठी ही खास परंपरा आहे.
या देशातील लोकांनी आजही ही प्रथा पाळली आहे, म्हणून दरवर्षी गेरेवोल फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. ज्यात मुलांनी विशिष्ट कपडे घालून त्यांचे चेहरे रंगवलेले असतात. त्यानंतर ते नृत्य आणि इतर अनेक माध्यमांनी इतरांच्या पत्नींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
यामध्ये ते यशस्वी झाले तर त्यांच्यासोबत महिला पळून जाण्यासाठी तयार होते. मात्र यामध्ये अट अशी असते की या महिलेच्या पतीला पळून जाण्याची किंवा महिला चोरी करण्याची कुणकुणही लागता कामा नये. नाहीतर त्यांचं लग्न होऊ शकत नाही. मात्र जर पुरुष यामध्ये यशस्वी झाले तर त्या दोघांचं लग्न लावून दिलं जातं.
खास गोष्ट म्हणजे या महोत्सवात पुरुषांच्या सौंदर्याची परीक्षा घेणासाठी महिला जज बनतात. जजला जो पुरुष आवडेल त्याच्यासोबत लग्न करण्याचं स्वतंत्र्य असतं.