पाण्यावर तरंगणारा बर्फ, मद्याच्या ग्लासात जाताच का बुडतो? रहस्य की विज्ञान, जाणून घ्या...

Why ice floats in water ? बर्फाचा खडा पाण्याच्या ग्लासात टाकून तो तरंगतो हे आपण सर्वांनीच पाहिलं. पण, तुम्ही कधी मद्याच्या ग्लासात याच बर्फाच्या खड्याला झिंगताना पाहिलंय? कमाल आहे यामागचं कारण...   

सायली पाटील | Updated: May 18, 2023, 03:25 PM IST
पाण्यावर तरंगणारा बर्फ, मद्याच्या ग्लासात जाताच का बुडतो? रहस्य की विज्ञान, जाणून घ्या... title=
Why ice floats in water and why it doesnt in alcohol glass know interesting facts

Why ice floats in water ? सध्या उकाड्याचे दिवस सुरु असल्यामुळं जो- तो आपआपल्या परिनं या उन्हाळ्याशी दोन हात करताना दिसत आहे. सरबत म्हणू नका किंवा माठातील पाणी. काहीतरी थंड प्यावंसं वाटतंय असं म्हणत आपण सर्रास शीतपेय घटाघट पिऊ लागतो. बऱ्याचदा तर, बर्फाचा गोळा, किंवा अख्खाच्या अख्खा बर्फाचा खडाच पाण्यात टाकून ते थंडगार पाणी पिताना असनेकजण दिसता. हे पाणी पिताना तुम्ही एक गोष्ट पाहिलीये का, बर्फाला वजन असूनही तो पाण्यावर तरंगतो. पण, हाच बर्फाचा खडा जेव्हा मद्याच्या ग्लासात पडतो तिथं मात्र तो पटकन बुडतो. 

तुम्ही हे अनेकदा पाहिलं असेल, पण हे असंच का? हा प्रश्न तुम्हाला क्वचितप्रसंगीच पडला असेल. चला तर मग, जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर. आता तुम्हाला वाटेल की, यात काही रहस्य वगैरे दडलंय की काय? पण, तसं नाहीये. यामागे आहे एक वैज्ञानिक कारण. 

हेसुद्धा वाचा : Alert : पुढील 5 वर्षांत जगभरातील तापमान मोठ्या फरकानं वाढणार; तुमच्या भवितव्याला उष्णतेच्या झळा

थोडं शालेय अभ्यासक्रमात डोकावूया. इथं आपल्याला घनतेची व्याख्या आठवायची आहे. पदार्थाचं वस्तुमान आणि आकारमान यांचं गुणोत्तर म्हणजे घनता. बऱ्याचदा एखाद्या लहान पण, वजनानं जास्त असणाऱ्या वस्तूची घनता त्याहून मोठ्या आकारमानाच्या वस्तूपेक्षा जास्त असते. महान शास्त्रज्ञ archimedes नं याचा शोध लावला होता. 

मद्याच्या ग्लासात बर्फ झिंगतो? 

जाणून आश्चर्यच वाटेल. पण, बर्फ तरंगणं आणि बुडणं हे त्याच्या घनतेवर आधारित असतं. थोडक्यात द्रवाची घनता पदार्थापेक्षा जास्त असेल तर तो पदार्थ बुडतो. वैज्ञानिक आकडेवारीनुसार पाण्याची घनता 1.0 प्रती घनसेंटीमीटर असते. आणि बर्फाची घनता 0.917 प्रती घन सेंटीमीटर इतकी असते. हेच मूळ कारण आहे ती पाण्याहून घनता कमी असूनही बर्फाचा खडा पाण्यावर तरंगतो. मद्याच्या बाबतीत उलट क्रम पाहायला मिळतो. इथं मद्याची घनता 0.789 प्रती घन सेंटीमीटर असते. हा आकडा बर्फाच्या घनतेहून कमी आहे. त्यामुळेच मद्याच्या ग्लासात बर्फ बुडतो. विनोदी भाषेत सांगावं तर, मद्याच पडून बर्फही झिंगतो. 

तेव्हा इथून पुढं पाण्यात बर्फ का तरंगतो आणि मद्याच्या ग्लासात जाताच तो का बुडतो? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर, त्यांना उदाहरणासह या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या.