मुंबई : आयुष्य घालवण्यासाठी आपल्याला जोडीदाराची गरज असते असं म्हणतात. परंतु हे लक्षात घ्या की संसार किंवा प्रेम हे कोणा एका व्यक्तीमुळे चालत नाही. यासाठी दोन्ही व्यक्तींना सारखाच सहभाग घ्यावा लागतो. परंतु एका 26 वर्षीय तरुणीसोबत एक भलताच प्रकार घडला, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या तरुणीने स्वत: तिच्यासोबत घडलेल्या या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितलं आहे. जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
खरंतर या तरुणीचा प्रियकर बेपत्ता झाला असे, तिने सोशल मीडियावर सांगितले, परंतु जेव्हा तिला तिच्या प्रियकरासोबत नक्की काय घडलं, यागोष्टीचा सुगावा लागला, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, मुलीचे नाव रेचेल वॉटर्स आहे. रेचलचा जन्म अमेरिकेत झाला, परंतु ती सध्या चीनमध्ये राहते. अलीकडेच तिने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, तिचा प्रियकर पॉल मॅगी ब्रिटनला ट्रिपला गेला होता. परंतु बरेच दिवस झाले तरी, तो परतला नाही, तसेच त्यानंतर त्याने रेचेलला फोन देखील केला नाही.
यानंतर रेचलला आपल्या प्रियकरा विषयी खूपच चिंता वाटली, ज्यामुळे तिने आपल्या फेसबुकवरुन आपल्या प्रियकराच्या मित्रांना विचारपूस करायला सुरुवात केली. त्यावेळी रेचेलच्या जे सत्य समोर आलं, ते ऐकून तिच्या पायाखालची जमिनच सरकली.
40 वर्षीय पॉलच्या शोधात रेचेलने फेसबुकच्या माध्यमातून त्याच्या मित्रांशी संपर्क साधला. तेव्हा तिला कळले की, पॉल विवाहित आहे आणि त्याला मुले देखीलआहेत. तो आपल्या कुटुंबासह ब्रिटनमध्ये राहतो.
तिच्या समोर जेव्हा हे सत्यसमोर आलं, तेव्हा तिचा विश्वासच बसत नव्हता की, तिची फसवणूक झाली आहे. वास्तव समजल्यानंतर रॅशेलने फेसबुकवरून तिची पोस्ट हटवली, ज्यामध्ये तिने पॉलबद्दल माहिती विचारली होती. रेचल ही व्यावसायिक व्हॉलीबॉल खेळाडू आहे.
रिपोर्टनुसार, कोरोनामुळे चीनच्या शेनझेनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा पॉल तिथेच अडकला होता. यादरम्यान त्याची रेचेलशी जवळीक वाढली आणि दोघेही रिलेशनशिपमध्ये आले. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर काही दिवसांनी पॉल ब्रिटनमधील त्याच्या देशात गेला आणि परत आलाच नाही. आता रेचेलनेही तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.