मुंबई : नवविवाहित जोडप्यासाठी हनीमून हा सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे. लग्न झाल्यानंतर एकमेकांना ओळखण्यासाठी आणि आनंदाचे क्षण जगण्यासाठी बरेच लोक हनीमून जातात. परंतु विचार करा जर हाच तुमचा दिवस खराब झाला किंवा नवीन लग्न असतानाच कोणच्या बायकोवर त्याचं चुकीचं इम्प्रेशन पडलं तर? मग बायकोला गैरसमज होणारच. लग्नानंतर हनीमूनसाठी कंबोडियाला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत असंच काहीसं घडलं आहे.
आता जरा विचार करा, या काळात तुम्हाला ऑफिसमधील काही महत्वाचे काम करण्यासाठी बॉसने तुम्हाला पुन्हा बोलवलं तर? नक्कीच तुम्ही खूप दुःखी व्हाल आणि तुमचा जोडीदारही निराश होईल.
अमेरिकेत राहणार्या एका व्यक्तीने Reddit वर सांगितले की, या वर्षी जानेवारीमध्ये तो हनीमून साजरा करण्यासाठी कंबोडियाला गेला होता. इतक्यात ऑफिसमधून त्याला बॉसचा फोन आला आणि त्यांनी काही तातडीच्या कामासाठी एक दिवस त्याला ऑफिसला यायला सांगितलं. हे ऐकून तो चिडला, कारण तो हनीमूनसाठी सुट्टी घेऊनच कंबोडियाला आला होता. ज्यामुळे तो एका दिवसासाठी इतक्या लांबून येऊ शकत नव्हता.
Reddit पोस्टमध्ये, त्या व्यक्तीने लिहिले की, 'मी नुकतेच लग्न केले आहे आणि कंबोडियामध्ये माझ्या हनीमूनसाठी गेलो होतो. मला आणि माझ्या पत्नीला अनेकदा कामातून सुट्टी मिळत नव्हती. त्यामुळे अनेक प्रयत्नानंतर आम्हाला या सुट्ट्या मिळाल्या होत्या, ज्या आपल्यासाठी खास होत्या. मी १ जानेवारीला रजेसाठी अर्ज केला होता, जो दुसऱ्याच दिवशी बॉसने मंजूर केला होता.'
त्या व्यक्तीने पुढे लिहिले की, 'परंतु असे असून देखील माझा बॉस आता मला हनीमूनच्या तिसऱ्या दिवशी क्लायंटच्या पिच मीटिंगला उपस्थित राहण्यास सांगत आहे. बॉसने त्याला सांगितले की, ही मिटींग खूप महत्त्वाची आहे आणि त्याला फक्त एका दिवसासाठी माझी गरज आहे. त्याला उत्तर देताना मी म्हणालो की हा माझा हनिमूनचा काळ आहे आणि मी कोणत्याही अटीवर तिथे येऊ शकत नाही. यावर बॉस म्हणाला, की ही फक्त एका दिवसाची बाब आहे आणि जर या महत्वाच्या बैठकीसाठी मी आलो नाही तर तो माझ्याबरोबर एक टीम म्हणून पुढे जाऊ शकणार नाही.'
या संपूर्ण प्रकरणावर पत्नीशी बोलल्यानंतर आता हा व्यक्ती दोन कठोर निर्णयांमध्ये अडकला आहे. त्याला भीती वाटते की एकतर बॉस त्याला काढून टाकेल किंवा त्याला हनीमूनला पुन्हा प्लॅन करावा लागेल. परंतु दुसरीकडे, तो जेव्हा त्याच्या बायकोला यासंदर्भात विचारतो, तेव्हा त्याच्या बायकोला, या सगळ्या प्रकारामुळे आपण लग्नच का केलं हा प्रश्न पडला आहे. सहाजिकच ती खूप रागवली असणार यात काही शंका नाही.
परंतु आता बायको आणि नोकरी या दोन महत्वाच्या गोष्टींमध्ये हा व्यक्ती पूरता फसला असणार हे नक्की. पुढे त्याचं काय झालं हे काही कळलेलं नाही. पण जे काही असो, पुन्हा कोणावरही अशी वेळ यायाला नको.