अपयशी तरी कितीदा होणार? पाहा यशाची व्याख्या बदलणारा हा Video

Viral Video : नजर खिळवून ठेवणारा हा काही सेकंदांचा व्हिडीओ आयुष्यभराचं सत्य सांगून जात आहे. 

Updated: Dec 5, 2022, 12:48 PM IST
अपयशी तरी कितीदा होणार? पाहा यशाची व्याख्या बदलणारा हा Video   title=
what is success this viral video is redefining the defination latest news

Viral Video : (Success) यशाचा मार्ग आणि त्याची व्याख्या ही प्रत्येकासाठीच वेगळी असते. किंबहुना यशाची रुपंही तितकीच वेगळी आणि थक्क करणारी असतात. पण, याच यशाच्या मार्गावर जात असताना अनेकांनाच काही वळणांवर सातत्यानं खाचखळगे येतात आणि मग ही वाट खडतर वाटू लागते (Success quote). यश आणि आपला दूरदूरपर्यंत संबंध नाही हीच भावना मनात घर करु लागते. नकळतपणे आपलं खच्चीकरण होत असतं आणि ध्येय्यापासून आपण दुरावले जात असतो. पण, जिद्द आणि चिकाटी या दोन अदृश्य घटकांच्या बळावर आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी यशाचा तो टप्पा गाठण्याची इच्छा तरीही जागृत असते. (what is success this viral video is redefining the defination latest news)

यश, सकारात्मकता (Positivity) आणि चिकाटी याच साऱ्यावर बोलायला खूप आहे, पण एका कलाकारानं आपल्या कलेच्या माध्यमातून या गोष्टी खुप सुरेखपणे मांडून ठेवल्या आहेत. जगाच्या प्रत्येक कोपऱ्याच असणाऱ्यासाठी या कलाकाराचा व्हिडीओ अतिशय महत्त्वाचा संदेश देत आहे. हा कलाकार म्हणजे फ्रेंच कोरिओग्राफर आणि परफॉर्मन्स आर्टिस्ट योआन बोर्जोइस (Yoann Bourgeois ). 

लहानसा व्हायरल व्हिडीओ ठरतोय अतिशय प्रभावी 

या व्हिडीओमध्ये योआन एका शिडीवर चढताना दिसत आहे. कसाबसा, हळुहळू तो या शिडीवर एक एक पाऊल ठेवत आहे. पण, दुसऱ्याच पावसावर तो त्यावरून खालीही पडत आहे. हो, पण त्यानं जिद्द काही सोडलेली नाही. 

हेसुद्धा वाचा : हर्षद मेहतापेक्षा खतरनाक खिलाडी, 14 वेळा लॉटरी जिंकणाऱ्या व्यक्तीलाच सरकारने केलं बॅन!

 

अतिशय सावकाश, पडत धडपडत, शेवटच्या टप्प्यावरून पुन्हा शुन्यावर येत आणि तिथून एक मोठी उसळी घेत अखेर तो यशाच्या शिखरावर अर्थात या शिडीच्या शेवटावर पोहोचत आहे. त्याला तिथे पाहून फक्त तो परफॉर्मन्स पाहणाऱ्यांनीच नव्हे, तर इथे स्क्रीनवर तुम्हीआम्हीही त्याचा हा व्हिडीओ पाहताना नकळतच दाद देत आहोत. 

mathieustern या (instagram) इन्स्टा पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. इथं कुठेही यशाचा संदर्भ देण्यात आलेला नला तरीही नेटकऱ्यांनी त्यातून बोध घेत ही संकल्पना यशाशी जोडली आहे. जगभरात असंख्य नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून योआन, त्याची कला आणि त्याच्या संकल्पनेचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. तुम्ही या व्हिडीओतून काय शिकलात?