चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : आकाश, अवकाश आणि आकाशगंगेमध्ये होणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या हालचालींची नोंद जगभरातील अवकाश संशोधन केंद्रांकडून ठेवण्यात येते

सायली पाटील | Updated: Jun 15, 2024, 01:08 PM IST
चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य title=
what is Lunar standstill know the date

Lunar Standstill : चंद्र... इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा चंद्र प्रत्येकाला तितक्याच बहुविध प्रसंगी भेटतो. प्रवासातील सोबती असतो, अनेकदा अंधाऱ्या वाटेवर प्रकाश देण्याचं कामही हाच चंद्र करतो. समुद्रातील भरती आणि ओहोटीचं गणितही या चंद्रावरूनच ठरतं असं म्हणतात. अशा या चंद्राचं आणि पृथ्वीचं कैक वर्षांचं नातं. अवकाशास्त्रज्ञ आणि खगोलविषक अभ्यासकांसाठी महत्त्वाचा असणारा हाच चंद्र आता म्हणे स्थिर होणार आहे, थोडक्यात तो एकाच ठिकाणी थांबणार आहे. 

दर 18.6 वर्षांनंतर ही अदभूत घटना घडते, जिथं चंद्राच्या हालचाली थांबतात. चंद्र थांबणार म्हणजे नेमकं काय होणार माहितीय? जाणकार आणि अभ्यासकांच्या मते चंद्र स्थिर होणार म्हणजे, क्षितिजापासून सर्वात दूरच्या अंतरावर चंद्र थांबणार असून, तिथंच त्याचा उदय आणि अस्त होणार आहे. या दोन्ही नैसर्गिक घटनांमधील वेळेचं अंतर वाढणार असून, आभाळातील सर्वाधिक उंचीवरील आणि निच्चांकी बिंदूवर या क्रिया पार पडणार आहेत. 

2006 नंतर ही अद्भूत घटना घडणार असून, हा तोच प्रसंग असेल जिथं क्षितिजावर सर्वात दूर चंद्रोदय होणार असून, तिथंच दूर दक्षिणेकडे चंद्रास्तही होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार दर 18.6 वर्षांमध्ये चंद्राच्या गतीमध्ये हा बदल होत असून, हे चंद्राचं कालचक्र आहे असं सांगण्यात येतं. चंद्रोदय आणि चंद्रास्ताची दिशा ही सूर्याप्रमाणं नसून, ती सतत बदलत असते. 

हेसुद्धा वाचा : विमानाचा पायलटही हॉर्न वाजवतो का? रंजक आहे उत्तर

यंदाच्या वर्षी होणारी ही घटना आणि हे अद्भूत बदल सप्टेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान पाहता येणार आहेत. निरभ्र आकाशात सारं जग या क्षणाचं साक्षीदार होऊ शकतं. चंद्रोदय आणि चंद्रअस्ताच्या वेळी अधिक ठळकपणे या दृश्याची साक्षीदार तुम्हीही होऊ शकता. 

सूर्यमाला ज्यावेळी एका सरळ रेषेत दिसते याचा अर्थ तेव्हा सर्व ग्रह सूर्याच्या सोबतीन सरळ रेषेत असतात. या प्रक्रियेला एक्लिप्टीक असं म्हटलं जातं. पृथ्वी तिच्या व्यासावर 23.4 टक्के इतकी झुकली असून, एक्लिप्टीक स्थितीणध्ये असं निरीक्षण दिसत नाही. ज्यामुळं सूर्योदय आणि सूर्यास्ताची रचना 47 अंशांच्या कोनात असते.