या नववधूला काय म्हणावं? म्हणे लग्नाला या आणि पैसे द्या, नाहीतर....

लग्नात येणाऱ्या पाहुण्यांकडे नववधूने पैशांची मागणी केली आहे. 

Updated: Sep 25, 2021, 12:50 PM IST
या नववधूला काय म्हणावं? म्हणे लग्नाला या आणि पैसे द्या, नाहीतर.... title=

मुंबई : लग्नात नववधू आणि नवरदेव हे लग्नाचे मुख्य आकर्षक असतात. त्यांना भेटण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी ते येतात. येताना ते वधू-वरासाठी भेटवस्तू घेऊन येतात किंवा आपल्या मनाप्रमाणे त्यांना पैसे देखील भेट म्हणून देतात. परंतु तुम्ही कधी हे ऐकलय का? की लग्नाला येण्यासाठी पाहूण्यांकडून पैसे मागितले जात आहे? हे ऐकायला थोड विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे.

लग्नात येणाऱ्या पाहुण्यांकडे नववधूने पैशांची मागणी केली आहे. नववधूने लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांकडून 3 हजार पौंड (3 लाख रुपये किंवा अधिक) पैसे मागितले आहेत.

एवढेच नाही तर पाहूण्यांनी तसे न केल्यास त्यांना तिच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमधून काढून टाकण्याची धमकीही तिने दिली आहे.

हे जोडपे थायलंडला जात आहे आणि थायलंडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करत आहे (Destination Wedding in Thailand)  आणि यामुळे वधूने प्रत्येक पाहुण्याकडे 3 हजार पौंडांची मागणी केली आहे. वधूने म्हटले आहे, "जेव्हा आम्ही आमच्या मित्रांना आणि कुटुंबाला (150 पाहुणे) थायलंडमध्ये आमच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी आमंत्रित केले, तेव्हा केवळ 9 लोकांनी आम्हाला उत्तर दिले. मला समजते की तुमच्यापैकी काही जणांना आमच्या खास दिवसाचा भाग म्हणून 3 हजार पौंड हे खूप जास्त आहे."

नंतर वधूने 150 पैकी केवळ 9 पाहुण्यांच्या संमतीमुळे आपल्या लग्नाचे ठिकाण थायलंडहून हवाई येथे बदलले. यामुळे आणखी 2 पाहुणे कमी झाले. आता या जोडप्याच्या लग्नाला फक्त 7 पाहुणे यायला तयार आहेत.

वधू पुढे म्हणाली, 'आता मी येथून पळून जाण्यासाठी हतबल आहे आणि कोणालाही आमच्या आनंदाच्या सर्वात मोठ्या दिवसाचा भाग बनू देणार नाही. मित्रांनो तुमच्याकडे उत्तर देण्यासाठी 3 दिवस आहेत. आपण अद्याप उत्तर न दिल्यास, आम्ही आपल्याला आमच्या फेसबुक लिस्टमधून काढून टाकू.

वधूच्या अशा वर्तनावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर लोकांच्या कमेंट्सचा पूर आला आहे. एका यूजरने म्हटले, 'लोकांनी माझे लग्न करताना पैसे द्यावेत अशी मी कल्पनाही करू शकत नाही!' त्याचवेळी दुसऱ्या एका यूजरने लिहिले, 'त्यांचे लग्न पाहण्यासाठी एवढा खर्च करण्यापेक्षा फेसबुक मित्र यादीतून बाहेर पडणे चांगले आहे.'