OMG! चक्क कुत्र्यासोबत महिलेचं Wedding Photoshoot, पाहा फोटो

नववधूनं कुत्र्यासोबत केलं Wedding Photoshoot, सोशल मीडियावर फोटो पाहून रंगली चर्चा 

Updated: Oct 22, 2021, 11:02 PM IST
OMG! चक्क कुत्र्यासोबत महिलेचं Wedding Photoshoot, पाहा फोटो title=

वॉशिंग्टन: प्रत्येकाचं स्वप्न असतं की वेडिंग फोटोशूट तर जबरदस्त झालं पाहिजे. एका महिलेनं आपल्या लाडक्या कुत्र्यासोबत वेडिंग फोटोशूट केलं. हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. अनेकांना प्रश्नही पडला की ही महिला खरंच या कुत्र्यासोबत लग्न करणार आहे की नाही. असे एक नाही तर अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र या महिलेनं केवळ वेडिंग फोटोशूट हा कुत्र्यासोबत केलं आहे. 

लग्नसाठी आपल्या कुत्र्यासोबत आली
फोटोतील ही महिला आपल्या लाडक्या कुत्र्यासोबत लग्नाच्या मंडपात आली. प्रत्येक विधीमध्ये कुत्रा असायला हवा असा आग्रह या महिलेचा होता. या महिलेचं नाव आहे हाना किम ही अमेरिकेतील रहिवासी आहे. हानाने आपल्या लाँग टाइम बॉयफ्रेंड जाराड ब्रिकमॅनसोबत विवाह केला. या विवाहाला कुत्र्याची विशेष उपस्थिती होती. 

हाना म्हणाली की माझी खूप इच्छा होती की लग्नाआधी मी या कुत्र्यासोबत वेडिंग फोटोशूट करावं. पांढऱ्या गाऊनमध्ये फुलांचा गुच्छ घेऊन तिने कुत्र्यासोबत खूप सुंदर फोटोशूट केलं आहे. हे फोटो वेडिंग फोटोग्राफरने सोशल मीडियावर शेअर करताच चर्चांना उधाण आलं. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाले आहेत. 

हाना आणि जाराड यांची भेट याच कुत्र्यामुळे झाली होती. त्यामुळे यामधील सर्वात महत्त्वाचा भाग कुत्रा आहे असं हानाला वाटत होतं. त्याच्यासोबत फोटोशूट करण्याचे तिचे स्वप्न तिने लग्नाआधी पूर्ण केलं. कुत्रा आपल्या लग्नातील अविभाज्य भाग राहावा ही हानाची इच्छा होती. तिच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात हा कुत्रा तिच्यासोबत असल्याचं हानाने सांगितलं आहे.