अलास्का एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याने पळवलेले विमान वॉशिंग्टनमध्ये कोसळले

 याचा घातपात किंवा दहशतवादाशी संबंध नाही.

Updated: Aug 11, 2018, 12:51 PM IST
अलास्का एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याने पळवलेले विमान वॉशिंग्टनमध्ये कोसळले title=

सिएटल: अमेरिकेत शनिवारी अलास्का एअरलाईन्सच्या एका कर्मचाऱ्याने विमान पळवून नेल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अमेरिकन लष्कराच्या लढाऊ विमानांनी या जेटचा पाठलाग केला. मात्र, काही वेळातच हे विमान वॉशिंग्टनमध्ये कोसळले. 

विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याचा घातपात किंवा दहशतवादाशी संबंध नाही. संबंधित कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विमान पाडले असावे. वॉशिंग्टनमधील एका हवाई तळावरुन अभियंता असलेल्या एका कर्मचाऱ्याने विमानाचा ताबा घेतला. विमानाने हवेत उड्डाण केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर लगेचच अमेरिकन लष्कराच्या विमानांनी या विमानाचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर हे विमान हवेत वेड्यावाकड्या गिरक्या घेताना दिसले. मात्र, काहीवेळातच हे विमान कोसळले.