Viral Video : प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने उचलले धक्कादायक पाऊल; मुलीला थेट उचलूनच...

Video : प्रेमात जेव्हा धोका मिळतो तेव्हा जे हाल होतात, जो मनस्ताप जो संताप होतो. या सगळ्याचा भरात अनेक जण टोकाचं पाऊल उचलतात.   

Updated: Dec 2, 2022, 03:04 PM IST
Viral Video : प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने उचलले धक्कादायक पाऊल; मुलीला थेट उचलूनच... title=
Viral Video girlfriend was kidnapped by her boyfriend as she refused to marry him on Social media nmp

Trending Video : प्रेमात (Love) आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणतात. ज्याने प्रेम केलं आहे. तोच ही भावना समजू शकतो, ज्यावर आपण अतोनात प्रेम केलं, ज्या व्यक्तीसोबत भविष्याची स्वप्न रंगवली. तोच व्यक्ती आपल्याला धोका देतो तेव्हा सगळं संपलं बस्स...आता जगायचं नाही असंच काहीस वाटतं... पण काही लोक तर गुन्हेगारी (crime news) वृत्तीकडे वळतात. ते बदला घेण्याची मानसिकता ठेवतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का (Shocking video) बसेल. 

थेट प्रेयसीचं अपहरण...

हा व्हिडिओ म्हणजे एक सीसीटीव्ही (CCTV) फूटजे आहे. मुलीने (girlfriend) लग्नाला (marriage) नकार दिला म्हणून तिचं अपहरण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना रशियामधील (Russia) आहे. 18 वर्षीय बेला रवोयन (Bella Ravoyan) या तरुणीने 20 वर्षीय अमिक शमोयन (Amik Shamoyan) याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. म्हणून अमिकने तरुणीला घरातून उचलून नेले. 

हेसुद्धा वाचा - Girls Fight Video : भररस्त्यात WWE चा थरार! भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारी
 
तरुणाला अटक

स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार बेला बेपत्ता झाल्याप्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसांना तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अमिकला अटक केली आहे.

 

हेसुद्धा वाचा -  Video : लग्नात फुकटचं जेवायला गेला 'रँचो', मग करावं 'हे' काम...

 

दरम्यान बेलाने तिच्या अपहरणाचा थरार कहाणी सांगितल्यावर अंगावर काटा येतो. बेलाचं अपहरण करुन तिला निझनी नोव्हगोरोड इथे नेण्यात आलं होतं. काही दिवसांनी बेलाने स्वत:च आपली सुटका करुन घेतली आणि पोलीस स्टेशन गाठलं. (Viral Video girlfriend was kidnapped by her boyfriend as she refused to marry him on Social media) 

या घटनेसंदर्भात अजून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात बेलाचे वडील यांनी अमिक यांच्या कुटुंबाच्या कॅफमध्ये जाऊन. त्याचा कुटुंबीयांवर बंदूक रोखली आहे. दरम्यान रशियाच्या अनेक भागात आजही वधू चोरी ही जुनी परंपरा पाळली जातं आहे.