Trending Video : आजकाल शाळेत असतानाच मुलाला गर्लफ्रेंड आणि मुलीला बॉयफ्रेंड असतो, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. शिक्षणाच्या वयात मुलांचं हे असं नातं सध्या ट्रेंड झाला आहे. त्यामुळे अनेक वेळा हे वाक्य ऐकायला मिळतं की, आमच्या जमान्यात असं नव्हतं बाबा. खेळा बागडण्याचा जमन्यात या मुलांचे प्रेम प्रकरण असतात. सोशल मीडियावर अशाच एका प्रेम प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Viral video Father caught daughter hugging her boyfriend littile girl boy Instagram video trending now )
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बंद दरवाज्यामागील कहाणी...दरवाजा उघडता क्षणी चिमुकली एका मुला मिठी मारत असताना पालकांनी तिला पकडलं. आपल्याला पकडल्याचं पाहून ती घाबरली आणि तिने त्या मुलाला दूर ढकलं. आपण पकडल्या गेलो आता पालकांना काय सांगणार...
त्या चिमुकलीला आई विचारते कोण आहे हा Jared...त्यावर ती म्हणते माझा बॉयफ्रेंड! हे ऐकून तिचे वडील म्हणात, तुला कोणी बॉयफ्रेंड नाही. त्यावर ती चिमुकली म्हणते मला बॉयफ्रेंड आहे. त्यावर वडील परत म्हणतात, तुला कोणी बॉयफ्रेंड नाही. हे ऐकून चिमुकली ढसाढसा रडायला लागते.
चिमुकलीला रडताना पाहून तिच्या आई तिला विचारते, काय झालं तुला? त्यावर चिमुकली म्हणाली Daddy म्हणतात माझा कोणी बॉयफ्रेंड नाही. त्यावर आई म्हणते तुला बॉयफ्रेंड आहे? त्यावर चिमुकली मान हलवत हो म्हणते. आई पुढे विचारत मग त्याचं नाव काय आहे? चिमुकली म्हणते Jared...
परत तिचे वडील म्हणतात, तुला कोणी बॉयफ्रेंड नाही...त्यावर चिमुकली काय करते पाहा हा व्हिडीओ....
बघितलं हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाला असाल की, काय ही आजची पिढी...त्या चिमुकलीचं बोलणं ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर kuldeepkaransing2023 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.