एक करता दोन; मुलीसोबत स्टंट करणं पडलं चांगलंच महागात!

सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंट व्हायरल होतं आहे. हा स्टंट करणं या मुलीला चांगलाच महागात पडला आहे.

Updated: Jul 9, 2022, 07:21 PM IST
एक करता दोन; मुलीसोबत स्टंट करणं पडलं चांगलंच महागात! title=

viral video - सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेक लोकं वेगवेगळी शक्कल लढवत असतात. काही लोकांना साहसी खेळ खूप आवडतात. आपण सोशल मीडियावर असे अनेक स्टंटवाले व्हीडीओ पाहिले आहेत. हे व्हीडीओ पाहून अंगावर काटा उभा राहतो. आपण बघितले आहेत, की यातील काही स्टंट जीवघेणे असतात. काही स्टंटसाठी वेडापणाच लागतो, हे साधारण मुलांचं काम नाही. हे धोकादायक स्टंट करण्यासाठी लोकं जीवाचा विचारही करत नाही. ही एक प्रकारची नशा असते.

सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंट व्हायरल होतं आहे. हा स्टंट करणं या मुलीला चांगलाच महागात पडला आहे. हा व्हीडीओ यूजर्स मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. या व्हीडीओवर कंमेट्सही करण्यात आले आहेत.  काही जण दुर्दैवी घटना म्हणतं आहे, तर काही जण हसणारे इमोजी टाकतं आहेत. हा व्हीडीओ पाहताना काही क्षणासाठी निशब्द व्हायला होतं. त्या मुलीचं पुढे काय झालं असणार, असा प्रश्न पडतो.

एका पार्कमध्ये एक मुलगा-मुलगी व्यायाम करत असताना त्यांनी स्टंट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे काही झालं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल. पाहूयात नेमकं काय झालं त्या मुलीसोबत.

मुलगा-मुलगी व्यायाम करत असतात. काही वेळाने ती मुलगी त्या मुलाकडे धावत येते. तो मुलगा तिला डोक्यावर उचलून घेतो. पण त्याचा तोल जातो. ती मुलगी डोक्यावर  पडते. काही सेकंदाचा हा खेळ त्या मुलीच्या जीवावर बेततो.

हा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जवळपास आतापर्यंत 20 हजार लोकांनी तो पाहिला आहे. एका यूजरने त्या मुलीसाठी चिंता व्यक्त केली आहे. तो म्हणतो, '' आशा करतो त्या मुलीची मान तुटली नसेल.'' हा व्हिडीओ व्हायरल असल्याने खरं तर त्या मुलीचं काय झालं ते समजू शकलं नाही. आपण प्रार्थना करुयात ती मुलगी सुखरुप असेल.

सध्या सोशल मीडियाचं तरुण पिढीमध्ये खूप क्रेझ आहे. त्यामुळे आपणही प्रसिद्ध व्हावं या मोहासाठी अनेक जण जीव धोक्यात घालतात. पण पोरांनो ज्या आई वडिलांनी कष्टाने आपल्याला लहानाचं मोठं केलं असतं, त्यांचा जरा विचार करा. कारण स्टंट करताना आपल्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे नको ते धाडस करणं आयुष्यात टाळा.