यांना आवरा! बिकनी गर्लनंतर आता मेट्रोत तरुणाने केली चक्क आंघोळ, कपडे काढून साबण लावतानाचा Video व्हायरल

Viral Video: काही दिवसांपूर्वी मेट्रोत बिकनी गर्लचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता मेट्रोत चक्क आंघोळ करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Updated: Apr 10, 2023, 05:55 PM IST
यांना आवरा! बिकनी गर्लनंतर आता मेट्रोत तरुणाने केली चक्क आंघोळ, कपडे काढून साबण लावतानाचा Video व्हायरल title=

Metro Man Taking Bath: दिल्ली मेट्रोत बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा (Metro Bikini Girl)  व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडिओवरुन सोशल मीडियावर दोन गट पडले होते. काही लोकांनी या मुलीच्या थेट चारित्र्यावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर काही जणांनी या मुलीची तुलना अतरंगी फॅशन करणाऱ्या उर्फी जावेदबरोबर (Urfi Javed) केली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणीने समोर येत यामागचं कारणही सांगितलं होतं.

मेट्रोतला आणखी एक व्हिडिओ
बिकनी गर्लनंतर मेट्रोतला (Metro) आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरुण मेट्रोत चक्क आंघोळ करतानाचा (Bath in Metro) हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून लोकांच्याही प्रतिक्रिया उमटत आहेत. या तरुणाने मेट्रोत अचानक कपडे उतरवत आंघोळीला सुरुवात केली. स्पंजने तो अंगाला साबण लावत असल्याचंही या व्हिडिओत दिसत आहेत. 

काय आहे व्हिडिओत?
आंघोळ करणाऱ्या तरुणाचा हा व्हिडिओ अमेरिकेतला असून न्यूयॉर्क मेट्रोत या तरुणाने हे अतरंगी कारनामे केले आहेत. हा व्हिडिओ काही महिने जुना आहे, पण तो पुन्हा एकदा ट्रेंड करताना दिसत आहे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे एक तरुण सुटकेस घेऊन मेट्रोत शिरतो. त्यानंतर तो अचानक आपले कपडे उतरवतो. त्यानंतर सुटकेस मध्ये पाणी टाकून स्पंजने आपल्या अंगाला साबण लावताना दिसत आहे. त्या तरुणाच्या हातात एक भांडं आहे, त्याने तो आंघोळ करताना दिसतोय.

सह प्रवासी घाबरले
तरुणाचे हे अंतरंकी कारनामे पाहून मेट्रोत बसलेले इतर प्रवासी चांगलेच घाबरलेले दिसत आहेत. काही प्रवासी तर बसल्या जागेवरुन उठून दुसऱ्या जागेवर बसले. तर काही प्रवाशांनी याचे व्हिडिओ बनवले. 

बिकनी गर्ल व्हायरल
मेट्रोत अशा अनेक विचित्र घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोत बिकनी गर्लच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला होता. त्या एका व्हिडिओनंतर त्या मुलीच्या इंस्टाग्रामवर 30 हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. सध्या ती सोशल मीडिया सेलिब्रेटी झाली आहे. त्याआधी एका कपल्सचा भर मेट्रोत रोमान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काही महिन्यांपूर्वी एका कपलचा एकमेकांना थपडा मारतानाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला होता.