Viral News | क्रुरतेचा कळस; रुग्णालयात रडल्याने लावला चार्ज; बिलामध्ये जोडली रक्कम

इमोशनल एक्स्प्रेस करण्यासाठी चार्ज द्यावा रुग्णालयाला चार्ज द्यावा लागल्याची घटना घडली आहे. बिल पाहून प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करीत आहे.

Updated: Oct 1, 2021, 05:12 PM IST
Viral News | क्रुरतेचा कळस; रुग्णालयात रडल्याने लावला चार्ज; बिलामध्ये जोडली रक्कम title=

नवी दिल्ली : कल्पना करा की, तुम्ही उपचारासाठी एखाद्या रुग्णालयात जात असाल, तेथे आपल्या भावना व्यक्त करताना तुम्हाला अश्रू अनावर झाले. तर तुम्ही त्या अश्रुंचे पैसे रुग्णालयाला देणार का? नाही ना. असंच काहीसं एका रुग्णालयात घडलं आहे. जेव्हा एक रुग्ण रुग्णालयात सर्जरीसाठी पोहचली तेव्हा आपली सर्जरी सुरू असताताना इमोशनल झाली. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तर रुग्णालयाने हातात बिल दिल्यावर इमोशनल एक्स्प्रेस करण्यासाठी चार्ज द्यावा लागला. बिल पाहून प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करीत आहे.

रुग्णालयात जाणे कोणालाही आवडत नाही. परंतु आजारपणामुळे रुग्णालयात जावे लागते. तेथे योग्य उपचार घ्यावे लागतात. संयुक्त राज्य अमेरिकेतील एका महिलेने रुग्णालयाचा विचित्र अनुभव शेअर केला आहे. एका महिलेने दावा केला की, सर्जरी दरम्यान रडल्याने त्याचा चार्ज तिच्याकडून वसूल करण्यात आला. या महिलेने हा आश्चर्यकारक दावा केला आहे. 

रुग्णालयावर टीका
या घटनेनंतर नेटकऱ्यांनी अमेरिकी हेल्थकेअर सिस्टीमवर मोठे सवाल उपस्थित केले आहे. अमेरिकी रुग्णालयाने अशाप्रकारे क्रुर प्रवृत्तीने लावलेल्या बिलामुळे टिकेचा वर्षाव होत आहे. आपले ट्विटर हॅंडल @mxmclain वर त्यांनी या बिलाचा फोटो शेअर केला आहे. या चार्जला रुग्णालयाने ब्रीफ इमोशन  असे नाव दिले आहे. ज्यावर 11 अमेरिकी डॉलरचे शुल्क लावण्यात आले आहे.