Viral Video : नवरा बायकोमधील (husband and wife) नातं हे प्रेम, विश्वास आणि एकमेकांप्रती सन्मान यावर ( relations and trust ) उभं असतं. पण जेव्हा या नात्यात प्रेमाची जागा संशय घेतो तेव्हा नात्यातील गोडवा संपुष्टात येतो. नात्याला एकदा संशयाची छळ बसली की ते नातं दिवसेंदिवस रिकाम आणि पोकळ होत जात. या संशयामुळे ( trust between husband and wife). आपण आपल्या आजूबाजूला अनेक संसार उद्धवस्त होताना पाहिले आहेत. एकदा काय नवरा बायकोमधील नात्याला तडा गेला की, नातं चुकीच्या दिशेने भरकटत जातं. अगदी काळरात्रीप्रमाणे एखाद्या क्षणी तुमच्याकडून एखादं गंभीर गुन्हा देखील घडतो. असंच काहीस झालं तिच्या आणि त्याच्यामध्ये. (viral news Man Installs Hidden Camera in Bedroom to See Wife Is Faithful to Him video viral on Internet trending video today)
सुखी कुटुंब नवरा बायको आणि मुलं...ती घरी असायची आणि तो ऑफिसमध्ये जायचा. लग्न झालं तेव्हा ते दोघे एकत्र खूप वेळ घालवत होते. रोमान्स ते त्यांच्या कायम फुलत असायचा. याच प्रेमातून त्यांच्या आयुष्यात छोटं अकुंर आलं. मग बायको घर आणि मुलांमध्ये रमली. तो ऑफिसला जायचा. काही दिवस सगळं छान होतं. पण तो ऑफिसमधून आल्यावर ती त्याला वेळ द्यायची नाही. त्याच्याकडे प्रेमाने बघायची नाही. बेडरुममध्येही त्याला त्याची पहिलेची बायको काही दिसतं नव्हती. आता त्याला बायकोबद्दल संशय येऊ लागला.
दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत होता. आता त्याचं मन अस्वस्थ झालं होत. काही करुन त्याला छडा लावायचा होता. ऑफिसला गेल्यावर त्याची बायको नेमकी घरात असं काय करते की, ती एवढी थकलेली असते. आमच्यामधील रोमान्स ती विसरली आहे. बेडरुममधील त्याची बायको हरवली होती. या सगळ्या प्रश्नांनी त्याचा मनात आणि डोक्यात नुसता गोंधळ घातला होता. आता काहीही करुन छडा लावायचाच. त्याची त्याने एक निर्णय घेतला.
त्याने बेडरुममध्ये...
बायकोचं सत्य जगासमोर आणण्यासाठी त्याने बेडरुममध्ये CCTV लावण्याचं ठरवलं. त्याचा मनातील प्रश्नांची उत्तर आणि संशय सिद्ध करण्यासाठी त्याने बायको घरी नसताना बेडरुममध्ये सीसीटीव्ही लावला. आता तो घरी नसताना घरी कोण येतं जातं. बेडरुममध्ये आपली बायको असं काय करते की ती एवढी थकते. हे सगळं या सीसीटीव्हीमध्ये कैद होतं होतं.
बायकोचं सत्य समोर आल्यानंतर...
त्याने फुटेज पाहण्यास सुरुवात केली आणि त्याला मोठा धक्काच बसला. बायकोचं हे सत्य समजल्यावर त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्याने व्हिडीओमध्ये पाहिलं की, रात्रभर त्यांची मुलं तिला झोपू देत नाही. तरीदेखील ती रोज सकाळी उठायची त्याच्यासाठी आणि मुलांसाठी नाश्ता, जेवण करायची. एवढंच नाही तर मुलांची आंघोळ घरातील इतर काम करण्यात तिचा अख्खा दिवस जायचा. घरातील कामं, मुलांची पालनपोषण आणि अपुरी झोप यामुळे ती रोज रात्री थकलेली असायची. हे पाहून नवऱ्याला धक्काच बसला. त्याला त्याची चूक उमगली. त्याच्या हेही लक्षात आलं की, संसारात ती एवढी मग्न आहे की, तिला स्वतःलाही वेळ देता येतं नाही.
त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्या प्रत्येक पुरुषांसाठी आहे ज्यांना वाटतं ती घरी काय करते एवढं थकायला काय झालं दिवस भर घरीच असते ना. मी ऑफिसमधून थकून आल्यावर तिने माझी सेवा करावी आणि रात्री बेडरुममध्ये माझ्यावर प्रेम करावं. पण नाही, थांबा तुम्ही पण इथेच चुकत आहात. संसार हा दोघांचा आहे, तो दोघांनी चालवायला हवा. घरातील काम वाटून घ्यायला हवं. आजची स्त्री ही घर आणि नोकरी असं दोन्ही सांभाळतं म्हणून तिच्या थकण्याचं कारण दुसरंच काही असं शकतं हा विचार करणं चुकीचं आहे. असो, ज्या नवऱ्या बायकोची ही कहाणी आहे ती अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या मेलानिया डार्नेल या महिलेची आहे.