कॅलिफोर्निया : काही घटना या अशा असतात ज्याचे गुढ किंवा त्यामागचे कारण आपल्याला कधीही समजत नाही. परंतु त्या आपल्याला त्यांच्या विषयी विचार करायला भाग पाडतात. एक अशीच घटना समोर आली आहे. ही घटना इतकी विचित्र आहे की, जी ऐकुन तुम्ही त्याबद्दल विचारच करत बसाल, परंतु याचं उत्तर मात्र तुम्हाला मिळणार नाही. येथे एक महिला दोन काँक्रीटच्या भिंतींमध्ये अडकली. जेव्हा बचावकर्त्यांनी या महिलेची सुटका केली, तेव्हा ती नग्न अवस्थेत होती.
अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कॅलिफोर्नियामधील एक महिला दोन इमारतींच्या काँक्रीटच्या भिंतींमध्ये अडकलेली आढळली. तिला वाचवण्यासाठी बचाव पथकाने काही तास खूप मेहनत घेतली. अथक प्रयत्नानंतर या महिलेला सुखरूप बाहेर काढले गेले. परंतु तिची परिस्थिती गंभीर असल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
फॉक्स न्यूज डॉट कॉमवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सेंटा एना येथील ऑरेंज काउंटी फायर अथॉरिटीने सांगितले की, ही महिला दुपारी अडीचच्या सुमारास एका भिंती मागे असल्याचे त्यांना आढळले.
घटनास्थळाजवळील एस एंड सी ऑटो बॉडी शॉपच्या (S & C Auto Body) कर्मचार्यांनी सांगितले की, त्यांनी एका महिलेचा आवाज ऐकला ही, महिला मदतीसाठी ओरडत होती, परंतु ते लोकं तिली शोधू शकले नाही आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना मदतीसाठी बोलावले.
कर्मचार्यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा पोलिसांना बोलले तेव्हा ते या महिलेचा आवाज ऐकून छतावर चढले. त्यांनी दोन भिंती दरम्यान पाहिले, तेव्हा त्यांना तेथे एक नग्न स्त्री दिसली.
तिला वेदना होत होत्या ज्यामुळे ती रडत होती. ती महिला तिथे उलटी अडकली होती. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महिलेला एक फूट रुंदीपेक्षाही कमी जागेत अडकली होती.
OCFA technical rescue team is on scene in the 1020 block of N Harbor Blvd in @CityofSantaAna attempting to get to get an adult female wedged between two walls out. pic.twitter.com/fvBznHlUrg
— OCFA PIO (@OCFA_PIO) July 13, 2021
महिलेला बाहेर काढल्यानंतर तिला थेट रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु, अग्निशमन अधिकाऱ्यांनी ही महिला आत कशी अडकली किंवा ती नग्न अवस्थेत कशी? हे काही स्पष्ट झाले नाही.
ओसीएफए कॅप्टन थान नुगेन म्हणाले की, हे सध्या आपल्या सर्वांसाठी एक रहस्य आहे. याची माहिती आद्याप आम्हाला मिळालेली नाही. ही महिला शुद्धीत आल्यानंतर याचे कारण समोर येईल.