ऑस्करच्या ट्रॉफीवर ही नेमकी कुणाची मूर्ती आहे, जी मिळवण्यासाठी कलाकार जीवाचं रान करतात

आजपर्यंत दोन हजार पेक्षा अधिक ऑस्कर ट्रॉफी देण्यात आल्या आहेत.

Updated: Jul 15, 2021, 06:15 PM IST
ऑस्करच्या ट्रॉफीवर ही नेमकी कुणाची मूर्ती आहे, जी मिळवण्यासाठी कलाकार जीवाचं रान करतात title=

पोपट पिटेकर, झी 24 तास, मुंबई : ऑस्कर... हॉलीवूडमधला प्रतिष्ठीत आणि सर्वोच्च असा सन्मान. हा सन्मान मिळवणं फिल्ममेकर आणि कलाकरांचे स्वप्न असतं. ही सोनेरी ट्रॉफी मिळवण्यासाठी कलाकार सर्वस्व पणाला लावून मेहनत करतात. पण जे उत्कृष्ट असतो त्यांच्याच पदरात हा सन्मान पडतो. स्वप्न सत्यात उतरल्यानंतर कलाकार हातात ट्रॉफी घेवून मिरवतो. ही सोनोरी ट्रॉफी कशी असती? त्यावर कुणाची मूर्ती असते? ती कशापासून बनते याचा विचार कधी केलात का ? तर मगं चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. (do you know Whose statue is in the Oscar trophy)

पहिल्यांदाच ऑस्करवर चर्चा

1927 मध्ये अ‍ॅकडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अ‍ॅड साइंजेसच्या मिटिंगमध्ये पहिल्यावेळेस ट्रॉफीच्या डिझाइनवर चर्चा केली. या दरम्यान लॉस एंजिल्सच्या अनेक कलाकारांकडून डिझाइन मागवण्यात आली होती.

16 मे 1929 मध्ये ऑस्करचं आयोजन 

अमेरिका अ‍ॅकडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅड साइंजेसच्या वतीने ऑस्कर पुरस्काराची सुरुवात पहिल्यांदा झाली. पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा 16 मे 1929 रोजी आयोजन करण्यात आलं होतं. 1927 साली अ‍ॅकडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अ‍ॅड साइंसेजच्या बैठकीत पहिल्यांदाच चर्चा झाली. या दरम्यान लॉस एंजिल्सच्या कलाकारांनी आपले डिझायन सादर केलं. यावेळी मूर्तीकार जॉर्ज स्टॅनली यांनी मूर्ती निवडली.

ऑस्करवर मॅक्सिकन फिल्म दिग्दर्शकाची मूर्ती 

एमिलियो फर्नांडीस उर्फ ईएल इंडियो हे मॅक्सिकन सिनेमातलं अजरामर नाव. ऑस्कर सन्मानावर जी मूर्ती असते ती याच अवलियाची. एमिलियो यांचा जन्म 1904 साली मॅक्सिकोमध्ये झाला. मॅक्सिकन रक्तरंजित क्रांतीत त्यांचा सहभाग होता. ह्युरटिस्टा बंडात सहभागी होण्यासाठी त्यांनी शाळा सोडली. पुढे त्यांना 20 वर्षांची शिक्षा झाली. मात्र, त्यांनी तिथून पळ काढत लॉस एंजिएल्स गाठलं.

ते लॉस एंजिएल्समध्ये हॉलीवूडमध्ये काम करू लागले. तिथे त्यांना सायलेंट फिल्म स्टार डोलोरेस डेल रियो यांनी ई.एल. इंडियो नाव दिलं. तिथे काम करताना कलाकार रियो यांचे चांगले मित्र बनले. रियो मेट्रो गोल्डविन मेयर स्टुडिओचे आर्ट डायरेक्टर आणि अ‍ॅकडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अ‍ॅड साइंसेचे सदस्य कॅड्रीक गिबॉस यांची पत्नी होती. डेल रियो यांनी फर्नांडीस आणि गिबॉस याची भेट घालून दिली. त्यावेळी ते ऑस्करच्या स्टॅच्यू डिझाइनवर काम करत होते.

फर्नांडीस यांना एकही ऑस्कर नाही

गिबॉस यांनी फर्नांडीसला एक स्केचसाठी पोज देण्यासाठी सांगितलं. खऱ्या अर्थाने हीच पोज सिनेमा सृष्टीतील आयकॉनिक ठरली. 8.5 पॉंडच्या या मूर्तीवर एमिलियो यांची हीच पोज साकारण्यात आलीय. त्यानंतर जॉर्ज स्टॅनली यांनी मूर्ती पूर्णपणे तयार केली. लॉस इंजिएल्समध्ये सन 1929 साली झालेल्या पहिल्या ऑस्कर सोहळ्यात ही ट्रॉफी सोपवण्यात आली. आजतागायत हीच डिझाइन आहे. हे सगळं ठिक असलं तरी, खूद्द एमिलियो यांना आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत ऑस्कर पुरस्कर मिळवता आला नाही.

आजपर्यंत 2 हजार ऑस्कर ट्रॉफीचं वितरण

आजपर्यंत दोन हजार पेक्षा अधिक ऑस्कर ट्रॉफी देण्यात आल्या आहेत. ऑस्करची ट्रॉफी शिकागोची कंपनी आर, एस, आयएस कंपनी तयार करते. या कंपनीला 50 ट्रॉफी बनवण्यासाठी तब्बल तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. सुरुवातीला या ट्रॉफी ताब्यांच्या असायच्या, पण आता त्या 24 कॅरेट शुद्ध सोन्यानं बनवल्या जातात. या ट्रॉफीची उंची फक्त 13 इंच असते.