आश्चर्यकारक! उन्हात जाताच महिलेच्या कपड्याचा रंग बदलला, Video पाहुन तुम्हालाच धक्का बसेल

बापरे! हे तर वेगळच मॅजिक आहे, उन्हात जाताच कपड्याचा रंग बदलतो, तुम्हालाही विश्वास बसत नसेल तर हा Video पाहा 

Updated: Oct 28, 2022, 07:01 PM IST
आश्चर्यकारक! उन्हात जाताच महिलेच्या कपड्याचा रंग बदलला, Video पाहुन तुम्हालाच धक्का बसेल title=

सोशल मीडियावर (Socila Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात.या व्हिडिओत अनेक व्हिडिओ खुप गाजतात, हे व्हिडिओ तुमचे मनोरंजन करून जातात, तर काही व्हिडिओ पाहून तुम्हालाच आश्चर्याचा धक्का बसत असतो. असाच आश्चर्यकारक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचे डोके चक्रावणार आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

घरातल्या किचनमध्ये सापडला किंग कोब्रा,अन् कुटुंबियांची पळता भुई थोडी झाली!पाहा VIDEO 

तुम्ही असे अनेक कीटक, वनस्पती आणि फुले पाहिली असतील जी सूर्यप्रकाशात गेल्यावर त्यांचा रंग बदलत असतो. मात्र तुम्ही कधी असा ड्रेस पाहिला आहे का? जो रंग बदलतो! नाही ना. तर आम्ही आज तुम्हाला असा ड्रेस दाखवणार आहोत. जो उन्हाळ्यात रंग बदलतो. या संदर्भातला व्हिडिओ (Video Viral) देखील समोर आला आहे, 

व्हिडिओत काय? 

व्हायरल व्हिडिओत (Video Viral) तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परीधान केला आहे. हा ड्रेस घालून ज्यावेळेत ती उन्हात जाते, तेव्हा तिच्या ड्रेसचा रंग बदलतो. या संदर्भातला व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती तिच्या इस्टाग्राम फॉलोर्सना ही घटना समजावून सांगत आहे. त्याचसोबत तिच्या ड्रेसचा रंग कसा बदलतोय, हे सांगत आहे.  

व्हिडिओत (Video Viral) महिलेने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. हा ड्रेस घालून ती आधी रूममध्ये असते. त्यानंतर ती उन्हात येते.उन्हात येताच तिच्या ड्रेसचा रंग बदलतो. तिचा पांढरा रंगाचा ड्रेस गुलाबी होऊन जातो. हा चमत्कार पाहून महिलेला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IZZI (@izzipoopi)

दरम्यान हा व्हिडिओ @izzipoopi नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो स्वतः एक फॅशन इन्फ्लुएंसर आहे. या व्हिडिओला 2 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर 22 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.