ओवल : भारतीय बँकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन फरार झालेला दारु व्यावसायिक विजय माल्ल्या शुक्रवारी इंग्लंडच्या ओवलच्या मैदानात दिसला. ओवलच्या रस्त्यावरून आपल्या कारकडे जाताना एका पत्रकारानं त्याला गाठलंच... आणि तो भारत परतणार की नाही? असा थेट प्रश्न केला. माल्ल्या तर पहिल्यांदा उत्तर न देताच पुढे निघू लागला... पण, पुन्हा हा प्रश्न विचारताच अवघडलेल्या माल्ल्यानं 'हा निर्णय कोर्ट करेल' असं म्हटलं. यासंबंधी मी मीडियाशी चर्चा करू इच्छित नाही असंही माल्ल्यानं यावेळी म्हटलं.
#WATCH: Vijay Mallya when asked if he will go back to India says, "judge will decide," outside The Oval in London's Kennington. pic.twitter.com/CmJY6YU9Um
— ANI (@ANI) September 8, 2018
भारत सरकार माल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नात आहे. याच वर्षी जून महिन्यात विजय माल्ल्यानं कर्नाटक हायकोर्टाकडे आपल्या यूबीएचएलला न्यायिक देखरेखीखाली विकण्यासाठी आणि सगळ्या देणेकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी परवानगी मागितली होती.
62 वर्षीय माल्ल्या मार्च 2016 पासून देशातून फरार झालाय. भारतीय न्यायालयानं न्यायालयासमोर हजर होण्य़ाचे आदेश दिल्यानंतरही तो लंडनमध्ये आहे.