Boy Kills Famiy: घरातील छोट्या मोठ्या भांडणांचा लहान मुलांवर थेट परिणाम होत असतो. लहान मुलांनी घरी रोज भांडणे पाहिल्यास त्यांच्या बाल मनावर परिणाम होतो. अनेक लहान मुले याने पीडित असतात. दरम्यान घरातील रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या 14 वर्षाच्या मुलाने टोकाचे पाऊल उतलले. त्याने भांडण करणाऱ्या आपल्या कुटुंबालाच संपवले. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अमेरिकेतील अलबामा येथे एल्कमोंट नावाचे छोटे शहर वसले आहे. या शहराची लोकसंख्या साधारण 500 इतकी आहे. येथे एक शांत मुलगा आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याचे नाव मेसन सिस्क असे असून तो 14 वर्षांचा होता.
त्याच्या कुटुंबात 38 वर्षांचे त्याचे वडील जॉन आणि 35 वर्षांची त्याची सावत्र आई होती. यासोबतच त्याला 3 सावत्र भावंडे होती. ज्यामध्ये 6 वर्षाची बहिण, 4 वर्षांचा भाऊ आणि 6 महिन्याचा छोटा भाऊ होता. मेसनचे वडील जॉन हे कार डीलरशिपमध्ये टेक्निशियन म्हणून काम करायचे. त्यांना मोटार बाईक्सची खूप आवड होती.
मेसन सिस्कच्या आईचे तो लहान असतानाच निधन झाले होते. यानंतर मैरीने तो 4 वर्षाचा असल्यापासून त्याची काळजी घेतली. मेरी ही स्पेशल एज्युकेशन टीचर होती. ती लवकरच पीएचडी करणार होती. मेरी आपल्या मुलांमध्ये कधी भेदभाव करत नव्हती. आतापर्यंत तुम्हाला या कहाणीमध्ये सर्वकाही चांगल वाटत असेल. पण यानंतर जे झाले ते खूप भयानक होते.
सिस्क हा अचानक विचित्र वागू लागला. त्याने शाळेत तोडफोड केली. सिस्क आपल्या कुटुंबियांसोबत नातेवाईकांना भेटण्यासाठी फ्लोरिडाला गेले होते. 2 सप्टेंबरला सर्व घरी परतले. सर्वजण खूप दमले होते म्हणून लवकर झोपी गेले. रात्री साधारण 11 वाजता सिस्कने एमर्जन्सी नंबरवर फोन केला आणि घरी गोळीबार झाल्याचे सांगितले.
जेव्हा अधिकारी घरात पोहोचले तेव्हा सिस्क रस्त्यावर त्यांची वाट पाहत होता. घटना घडली तेव्हा मी बेसमेंटमध्ये व्हिडीओ गेम खेळत होतो, तेव्हाच मला गोळ्या चालविण्याचा आवाज आला. मी बाहेर येऊन पाहीले तर कोणीतरी गाडीतून जात असल्याचे दिसले. असे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलीस अधिकारी घरात पोहोचले तेव्हा त्यांना जॉन, मेरी आणि त्यांच्या 3 मुलांचे शव मिळाले. सर्वांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली होती. ते झोपेत असताना ही गोळी घालण्यात आली होती. 4 वर्षाचा मुलगा आणि जॉनचा श्वास सुरु होता. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण ते वाचले नाहीत. तर मेरी आणि त्यांचा 6 महिन्यांचा मुलगा, मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला. नेमकं काय झालं आणि कसं झालं? हे अधिकाऱ्यांना कळायला मार्ग नव्हता.
पण गोळीबारात सिस्क एकटाच कसा वाचला? यावरुन त्यांना संशय आला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. पण परिवाराच्या खूनामागे आपला हात असल्याचे त्याने स्पष्ट नाकाराले. तो सारखं सारखं खोटं बोलत राहिला. त्याने थोड्यावेळाने कहाणी बदलली.
मी बंदूकीचा ट्रिगर दाबला होता, असे त्याने सांगितले. घटनेनंतर रस्त्यावर फेकलेल्या बंदुकीपर्यंत तो पोलिसांना घेऊन गेला. त्याने फ्लोरिडा प्रवासादरम्यान 9 एमएमची एक बंदूक चोरली होती. त्याने घरच्या सर्वांना एक-एक गोळी मारली. 6 महिन्याच्या बाळाला 2 गोळ्या मारल्या होत्या.
तू असे का केलेस? असे सिस्कला विचारण्यात आले. तेव्हा मी घरातील रोजच्या भांडणाला कंटाळलो होतो, असे त्याने सांगितले. ते खूप भांडणे करायचे आणि मुलेदेखील खूप सहन करायची, असे त्याने सांगितले.
यानंतर त्याने पोलिसांची माफी मागितली. ताब्यात घेतल्यानंतर त्याने एकदाही आपल्या परिवाराचा उल्लेख केला नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.