दुस-याच्या चुकीने ही महिला रातोरात झाली करोडपती!

अनेकजण आजही लॉटरी खरेदी करून आपलं नशीब आजमावत असतात. यात काहींचं नशीब खुलतं तर काही कंगाल होतात.

Updated: Jan 9, 2018, 10:16 AM IST
दुस-याच्या चुकीने ही महिला रातोरात झाली करोडपती! title=
Image Credit : nylottery.ny.gov

मॅनहॅटन : अनेकजण आजही लॉटरी खरेदी करून आपलं नशीब आजमावत असतात. यात काहींचं नशीब खुलतं तर काही कंगाल होतात. अमेरिकेत अशीच एक घटना समोर आली आहे. इथे का दुस-या व्यक्तीच्या चुकीने एक महिला रातोरात करोडपती बनली आहे. 

असा झाला घोळ...

ही घटना अमेरिकेतील न्यूजर्सीच्या मॅनहॅटनमधील आहे. इथे एका सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी आलेल्या ओक्साना जहारोव(४६) या महिलेने नशीब आजमवाण्यासाठी एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. लॉटरीच्या तिकीटाची किंमत १ डॉलर होती. पण स्टोरमध्ये बसलेल्या व्यक्तीने या महिलेला चुकीने १ डॉलरच्या तिकीटाऎवजी १० डॉलरची लॉटरी तिकीट दिली. 

बुकमार्क म्हणून वापरलं तिकीट

ओक्साना यांनी सांगितले की, ‘चुकीचं लॉटरी तिकीट मिळाल्यावरही मी ते तिकीट घेण्याचा निर्णय घेतला. पण ते तिकीट लगेच स्क्रॅच केलं नाही. मी ते तिकीट बुकमार्क म्हणून वापरत होते’.

आधी विश्वासच बसला नाही

ओक्सानानुसार, ‘जेव्हा मी हे लॉटरीचं तिकीट स्क्रॅच केलं तेव्हा मला धक्का बसला. लॉटरीवर ५ मिलियन डॉलर(३१ कोटी ६६ लाख रूपये)चं बक्षीस होतं. मी आत्तापर्यंत कधीच काहीच जिंकलं नाहीये. त्यामुळे माझा यावर विश्वास बसला नाही. नंतर मी ते लॉटरी तिकीट सुपरमार्केटमध्ये घेऊन गेली. तेव्हा मला विश्वास बसला की, मला लॉटरी लागली आहे. आता मी ५ मिलियन डॉलरची मालक आहे’.

असे मिळणार पैसे

ही लॉटरी जिंकल्यानंतर ओक्सानाला १९ वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी २६०,००० डॉलर(१ कोटी ६४ लाख रूपये) मिळणार आहे. यासोबतच अ‍ॅडिशनल पेमेंट रूपात ६० हजार डॉलर(३८ लाख रूपये) मिळतील. 

काय करणार पैशांचं?

ओक्सानाला या पैशातून परिवारासोबत अएक देशांची सैर करायची आहे. तिला या पैशातून मुलांच्या शिक्षणासाठीही काहीतरी करायचं आहे.