वॉशिंग्टन : इराणचे (Iran) जनरल कमांडर कासिम सुलेमानी (Qasem Soleimani) यांची अमेरिकन एअर स्ट्राईकमध्ये हत्या करण्यात आल्यानंतर अमेरिका आणि इराणचे संबंध कमालीचे ताणले गेलेत. दोन्ही देशांमध्ये तिसऱ्या युद्धाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. परंतु, इच्छा असूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इराणविरुद्ध युद्ध पुकारू शकणार नाहीत. याचं कारण म्हणजे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या संभाव्य कारवाईपासून रोखण्यासाठी अमेरिकन संसदेनं एक महत्त्वाचा प्रस्ताव संमत केलाय.
न्यूज एजन्सी रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात इराणविरुद्ध सैन्य कारवाईसाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार सीमित करणारं 'युद्ध शक्ती प्रस्ताव' (war powers resolution) संमत करण्यात आलाय.
House of Representatives approves war powers resolution to limit US President Donald Trump's (in file pic) ability to pursue military action against Iran: Reuters pic.twitter.com/Uq1Q7EuJ6Z
— ANI (@ANI) January 9, 2020
डेमोक्रेटिक पार्टी नीत अमेरिकेच्या प्रतिनिधिसभेत गुरुवारी मतदान करण्यात आलं. या प्रस्तावाच्या बाजुनं १९४ मतं पडली. या प्रस्तावाचा अर्थ आहे की, आता डोनाल्ड ट्रम्प यांना इराणविरुद्ध युद्धाची घोषणा करण्यापूर्वी काँग्रेसची मंजुरी घेणं गरजेचं असणार आहे. हा प्रस्ताव आता अमरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृहात संमत होणं आवश्यक आहे.
अधिक वाचा : 'तांत्रिक बिघाडानं नाही तर इराणच्या हल्ल्यात कोसळलं युक्रेनचं विमान'
अधिक वाचा : निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प इराणचा वापर करतायंत का?
अधिक वाचा : तिसरं विश्वयुद्ध झालंच तर कुणाची साथ कुणाला मिळणार? भारत कुणासोबत उभा राहणार?
अधिक वाचा : अमेरिकन दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला, संघर्ष अधिक तीव्र
अधिक वाचा : भूकंपाच्या धक्क्यानंतर इराणमध्ये कोसळलं युक्रेनचं प्रवासी विमान, १६७ ठार
हा प्रस्ताव काँग्रेस नेत्या एलिसा स्लॉटकिन यांनी अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सादर केला. एलिसा यांनी यापूर्वी CIA ऍनालिस्ट एक्सपर्ट म्हणूनही काम केलंय. यासोबतच एलिसा यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांत कार्यवाहक सहाय्यक सचिव म्हणूनही काम पाहिलंय.