सीरियात अमेरिका रशियाची लढाऊ विमानं पाडणार...

पेंटॉगॉनने रशियाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाणांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Updated: Dec 16, 2017, 06:44 PM IST
सीरियात अमेरिका रशियाची लढाऊ विमानं पाडणार... title=

कोलंबिया : पेंटॉगॉनने रशियाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाणांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. 

थोडक्यात टळली टक्कर

रशियन लढाऊ विमानांचे पायलट हे धाडसी पद्धतीने सीरियात उड्डाणं घेता आहेत. अगदी अलीकडच्या काही दिवसांतच अमेरिकेच्या एफ-२२ विमानांना दोन रशियन एसयू-२४ विमानं सीरियात ज्या भागात अमेरिकेचं वर्चस्व आहे, अशा ठिकाणी उडताना आढळली. तिथे अमेरिकन आणि रशियन विमानांची टक्कर थोडक्यात टळली. या प्रमाणेच जर सुरू राहिलं तर आमची विमानं रशियन विमानं पाडल्याशिवाय राहणार नाहीत, असं वक्तव्य पेंटॉगॉनच्या प्रवक्त्याने केलंय. 

आयसिस संपण्याच्या मार्गावर

सध्या अमेरिका पुरस्कृत आघाडी आयसिसचा पाडाव करण्यासाठी सीरियात लढतायेत. त्यात त्यांना यश मिळत असून आयसिस आता पूर्व सीरियातल्या अल्बू कमाल या भागात फक्त ३९ चौ. किमी भागांपुरते मर्यादित राहिलं आहे. 
ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या फौजा स्थानिक कुर्दीश आणि अरब फौजांना मदत करण्यासाठी हवाई हल्ले करत असतात. 

भावी संघर्षाची नांदी

अमेरिकन आणि रशियन विमानांची हवेत होणारी टक्कर टळण्याची ही काही पहिलीच वेळ नसून याआधीही असे प्रसंग घडले आहेत. रशियन तळ सीरियाच्या पश्चिमेस असून अमेरिकेचे तळ सीरियाच्या पूर्वेस आहेत.   आयसिसचा पाडाव होत असताना अमेरिका आणि रशियन विमानांच्या चकमकी या सीरिया आणि आजूबाजूच्या परिसरावर वर्चस्व ठेवण्यातून होता आहेत. यातून पून्हा एकदा अमेरिका विरूद्ध रशिया संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.