US Election 2020 : सुरुवातीच्या टप्प्यात बायडनचा पगडा भारी; ४ राज्यात ट्रम्प आघाडीवर

डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन आमने सामने 

Updated: Nov 4, 2020, 08:28 AM IST
US Election 2020 : सुरुवातीच्या टप्प्यात बायडनचा पगडा भारी; ४ राज्यात ट्रम्प आघाडीवर  title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात काटें की टक्कर आहे. मतदान पार पडल्यानंतर अमेरिकेच्या सर्व ५० राज्यांमध्ये मतमोजणी पार पडत आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकली तर ते सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे चौथे व्यक्ती ठरतील. डोनाल्ड ट्रम्प हे लुइसियाना, नेब्रास्का, नॉर्थ, डॅकोता, साऊथ डॅकोता, व्योमनिंग इथे विजय मिळवला आहे. तर बायडन यांनी न्यू मॅक्सिको, न्यूयॉर्कमध्ये विजय मिळवला आहे. 

या विजयासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे २० इलेक्टोरेल वोट आहेत तर बायडन यांच्याकडे ३४ इलेक्टोरेल वो़ट आहे. 

संपूर्ण जगाचं या निवडणूक निकालाकडे लक्ष

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या निकालाकडे साऱ्यांचच लक्ष लागून आहे. भारतासाठी हा निकाल अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण आताचे राष्ट्राध्यक्ष आणि निवडणूकीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे आणि भारताचे संबंध अतिशय चांगले आहे. भारताला असंच वाटेल की ट्रम्प यांचाच पुन्हा विजय व्हावा. मात्र चीन आणि इतर देशांना मात्र असे वाटत नाही. चीनबाबत डोनाल्ड ट्रम्प कायमच कडक वागत आले आहेत.