अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉर संपला, भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम... 

Updated: Oct 15, 2019, 03:43 PM IST
अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉर संपला, भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम title=

मुंबई : जगातील २ सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉर संपलं आहे. या संबंधित डीलवर दोन्ही देशांकडून करार झाल्याची माहिती आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार संबंधात मतभेद असल्यामुळे याचा परिणाम उद्योग धंद्यावर झाला आहे. जगभरात याचा परिणाम पाहायला मिळत होता. या दोन्ही देशांकडून मोठ्या प्रवानात वस्तू आयात आणि निर्यात करणाऱ्या भारतावर देखील याचा परिणाम झाला होता. 

अमेरिका आणि चीन आपआपले हित जोपासण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये व्यापार संबंधित वाद सुरु होते. चीनने अमेरिकेसोबत आता या मतभेदावर चर्चा करुन एका नवा करार केल्याची माहिती मिळते आहे. जाणकरांच्या मते, हा वाद आता संपल्यामुळे भारतावर देखील याचा परिणाम होणार आहे. पण हा परिणाम चांगला होणार आहे. सध्या जगभरात सुरु असलेल्या मंदीला हाच वाद जबाबदार होता.

चीन आणि अमेरिका यांच्यातील हा वाद आता बंद झाल्यामुळे भारत इतर देशांमध्ये ही आपल्या वस्तू निर्णाय करु शकणार आहे. ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधरण्यासाठी मदत होईल. पण या ट्रेड वॉरमुळे गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि चीनमधील व्यापार चांगलाच वाढला होता.