नशिबाचा खेळ! रस्त्याने चालणाऱ्या तरुणीसोबत भीषण अपघात, VIDEO पाहून बसेल धक्का...

नशिबाची साथ नसेल तर तुमच्यासोबत काही पण घडू शकतं.

Updated: Jul 27, 2022, 06:41 PM IST
नशिबाचा खेळ! रस्त्याने चालणाऱ्या तरुणीसोबत भीषण अपघात, VIDEO पाहून बसेल धक्का... title=

Viral Video:  सोशल मीडियावर आपण गेल्या काही दिवसात अनेक रस्ते अपघातांचे व्हिडीओ पाहिले आहेत. या अपघातात कोणी जीव गमवतो तर कोणाचा थोडक्यात जीव वाचतो. हे अपघात कधी स्व:ताच्या चुकीमुळे घडतात किंवा इतरांच्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. तर कधी कधी नशिबाचा भाग असतो. अशाच एक व्हिडीओला सोशल मीडियावर खूप व्ह्यूज मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्स अवाक झाले. 

भयानक अपघात

नशिबाची साथ नसेल तर तुमच्यासोबत काही पण घडू शकतं. असंच काहीस या व्हिडीओमधील तरुणीसोबत घडलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगी रस्त्याच्या कडेला आरामात चालत जात होती. ती ज्या रस्त्याने जात आहे तिथे बाजूला बस स्टॉपवर एक बस उभी आहे. रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरु आहे. या तरुणीला रस्त्याने जाताना मनात विचारही आला नसेल की काही क्षणात तिच्यासोबत काय घडणार आहे ते. 

बापरे...हा तर नशिबाचा खेळ

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचाच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तरुणी रस्त्याच्या कडेवरुन जात असताना, अचानक कुठूनतरी टायर उडून येतो. तेव्हा तो तिच्या बाजूने निघून जातो. यावेळी तिने सुटकेचा श्वास सोडला असेल पण हा टायर तरुणीच्या मागून एका खांबाला आदळतो आणि तरुणीला येऊन लागतो. या तरुणीला टायरची जोरदार धडक बसते आणि ती रस्त्यावर खाली पडते. 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर झाला आहे. तर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसंच हजारो यूजर्सने व्हिडिओला लाईक आणि रिट्विटही केलं आहे. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सने वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.