विमानाच्या बाथरूममध्ये प्रवाशाची हतबलता, एमरजन्सी लॅंडींग

विमानांचे एमरजन्सी हे लॅंडींग ही आता नवी गोष्ट राहीली नाही. पण, असे असले तरी, नुकतेच झालेले विमानाचे एमरजन्सी लॅंडींग हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लॅंडीगचे कारण ऐकाल तर, तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 7, 2018, 09:57 PM IST
विमानाच्या बाथरूममध्ये प्रवाशाची हतबलता, एमरजन्सी लॅंडींग title=

शिकागो : विमानांचे एमरजन्सी हे लॅंडींग ही आता नवी गोष्ट राहीली नाही. पण, असे असले तरी, नुकतेच झालेले विमानाचे एमरजन्सी लॅंडींग हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लॅंडीगचे कारण ऐकाल तर, तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

ही घटना युनायटेड एअरलाईन्सच्या एका विमानात घडला. हे विमान गुरूवारी शिकागोवरून हॉंकॉंगला निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान हे विमान अलास्का येथे अचानक उतरवावे लागले. विमानाचे एमरजन्सी लॅंडींग करावाले लाकले कारण, एका प्रवाशाचे पोट अचानक बिघडले. त्याने विमानाच्या टॉयलेटमध्ये इतकी घाण केली की, विमानाचे एमरजन्सी लॅंडींग करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

टेड स्टीवेंन्स इंटरनॅशनल एअरपोर्टवर उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यानेही प्रसारमाध्यमांना माहिती देताना या वृत्ताची पुष्टी केली. अधिकाऱ्याने सांगीतले की, एका प्रवाशाने पोटातील बिघाडामुळे विमानातील शौचालयात इतकी घाण केली की, इतर प्रवाशांना त्याचा त्रास होऊ लागला. इतकेच, नव्हे तर, या प्रवाशाने आपला शर्टही टॉयलेटमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला.