जबरदस्त! सिडनीमध्ये PM नरेंद्र मोदींचं अनोखं स्वागत, चक्क आकाशात लिहिलं नाव; VIDEO पाहून वाटेल अभिमान

PM Narendra Modi in Sydney: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तीन देशांच्या दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) पोहोचले आहेत. यावेळी नरेंद्र मोदींचं अत्यंत अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं आहे. आकाशात विमानाने 'Welcome Modi' लिहून नरेंद्र मोदींचं देशात स्वागत केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 23, 2023, 01:48 PM IST
जबरदस्त! सिडनीमध्ये PM नरेंद्र मोदींचं अनोखं स्वागत, चक्क आकाशात लिहिलं नाव; VIDEO पाहून वाटेल अभिमान title=

PM Narendra Modi in Sydney: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याअंतर्गत ते ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) दाखल झाले आहेत. नरेंद्र मोदी तीन दिवस ऑस्ट्रेलियात थांबवणार असून यावेळी ते राजधानी सिडनीत (Sydney) वास्तव्यास असतील. नरेंद्र मोदींनी यावेळी हरित ऊर्जा आणि तंत्रज्ञान कंपनी फोर्टेस्क्यु फ्यूचर इंडस्ट्रीजच्या कार्यकारी अध्यक्षांची भेट घेतली. तसंच ते सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान यावेळी नरेद्र मोदींचं ज्या अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं त्याने सर्वांचं लक्ष वेधलं.

नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ऑस्ट्रेलियाने अनोखी व्यवस्था केली होती. नरेंद्र मोदी पोहोचल्यानंतर सिडनीमध्ये अवकाशाता विमानाने 'Welcome Modi' असं लिहिण्यात आलं. या स्वागताने उपस्थित सर्वांचंच लक्ष वेधून घेतल होतं. 

ANI ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून हजारो लोकांनी तो पाहिला असून तो लाइक केला आहे. यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी भारतीयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोदींच्या स्वागतासाठी ढोल आणि झेंडे घेऊन लोक थांबले होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष करत ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. 

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.  दरम्यान, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनीत प्रमुख कंपन्यांच्या व्यावसायिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तंत्रज्ञान, कौशल्य आणि हरित ऊर्जा अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारताचा सहभाग वाढवण्याचं आश्वासन दिलं. 

नरेंद्र मोदींचे सिडनीत आगमन झाल्यावर भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ'फेरेल यांच्यासह अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. याशिवाय ते भारतीयांकडून आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारचे पाहुणे या नात्याने मोदी हा दौरा करत आहेत. 

ऑस्ट्रेलियन सरकारने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, दोन्ही देशांचे सर्वोच्च नेते द्विपक्षीय बैठकीत व्यापार आणि गुंतवणुकीवर चर्चा करतील, तसंच सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराद्वारे दोन्ही राष्ट्रांमधील व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नांवर आणि संबंध मजबूत करण्यासाठी काम, अक्षय ऊर्जा, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य यावर चर्चा करतील.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी परदेशी गुंतवणुकीसाटी भारत जगातील सर्वात आवडती अर्थव्यवस्था आहे असं सांगितलं. तसंच त्यांनी यावेळी भारतात गुंतवणूक करण्यासाठी ऑस्ट्रेलियन उद्योजकांना आमंत्रण दिलं.